Home Loan Information in Marathi | होम लोन माहिती मराठी: होम लोन पात्रता, कागदपत्रे, Quick कर्ज कसे मिळवावे.

पोस्ट शेअर करा :

Home Loan Information in Marathi:

नमस्कार मित्रांनो, स्वतःचे हक्काचे घर असावे ही आपण सर्वांचीच इच्छा असते. परंतु घर घ्यायच असेलतर सर्वात प्रथम विचार येतो तो म्हणजे गृह कर्जाचा म्हणजेच Home Loan चा. होम लोन बोलताना जितक साध सरळ वाटत तितकाच ते घेताना बऱ्याच अडचणींचा सामना देखील करावा लागतो. यामागाचे महत्वाचे कारण म्हणजे आपण एकतर लोन बद्दल सविस्तर माहिती घेतलेली नसते आणि बँक मध्ये अर्ज करण्यापासून कर्ज मिळे पर्यंतच्या सर्व गोष्टी आपल्याला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालेल्या असतात.

यासाठीच हा महत्वाचा लेख संपूर्ण वाचा. या लेखात आपल्याला होम लोन चे किती प्रकार असतात असतात? होम लोन कसे काढावे? होम लोन चे फायदे? होम लोन साठीचे कागदपत्र? अश्या संपूर्ण महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

होम लोन म्हणजे काय? (Home Loan Meaning in Marathi)

स्वतःच्या मालकीच घर घेण्यासाठी किंवा बांधकामासाठी बँके मार्फत दिले जाणारे कर्ज ही गृह कर्ज म्हणजेच होम लोन या विभागात मोडते. होम लोन किंवा गृह कर्ज ज्याला आपण म्हणतो ही साधारणतः फक्त घर घेण्यासाठीचे कर्ज आपण मानतो. होम लोन ही नवीन घर घेण्यासाठीचे असून इतरही अनेक प्रकारे आपण होम लोन घेऊ शकतो. जसे की जमीन खरेदी, जमिनीवर घर बांधकाम करण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी आणि घराची डागडुजी तसेच पुनर्बांधणी करण्यासाठी.  

होम लोनचे प्रकार? (Types Of Home Loans in Marathi)

  • घर खरेदीसाठी कर्ज : रेडिमेड घर किंवा फ्लॅट घेण्यासाठीचे हे कर्ज असते.
  • जमीन खरेदीसाठी कर्ज : घर बांधण्यासाठी जमीन घेण्यास हे कर्ज दिले जाते. या कर्जासाठी अट म्हणजे घर बांधण्यासाठी घेणारी जमीन ही नॉन अग्रि झोन मधील असावी.
  • घरबांधकाम कर्ज : हे कर्ज तुमच्या हककाच्या जागेत तुम्हाला घर बांधकामासाठी दिले जाते.
  • घर सुधारणेसाठी कर्ज : हे कर्ज घराला डागडुजी करणे, घरात सुधारणा करणे तसेच अंतर्गत इतर सुधारणा करण्यासाठी दिले जाते.
  • घराचा विस्तार करण्यासाठी कर्ज : हे कर्ज तुम्ही राहत असलेल्या घरात अजून खोली किंवा मजला बांधण्यासाठी दिले जाते.   
  • बॅलेन्स ट्रान्सफर होम लोन : हे लोन तुम्ही सध्या चालू असलेल्या बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करत असाल तर याला बॅलेन्स ट्रान्सफर म्हणले जाते. यामध्ये तुमचे चालू लोन उर्वरित रकमेवर ही दुसरी बँक कमी व्याजदराणे स्वतःकडे घेते.  
  • स्टॅम्प ड्यूटी कर्ज : घर किंवा जमीन खरेदी करताना देण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी ही कर्ज दिले जाते.
  • कंपोसीट होम लोन : हे कर्ज घर बांधण्यासाठी लागणारी जमीन आणि घरबांधकाम यासाठी एकत्र कर्ज बँकेतून आपण घेऊ शकतो.

होम लोनचे फायदे (Home Loan Benefits In Marathi)

  • होम लोन सर्वसाधारणतः प्रतेक व्यक्तीला हमखास मिळू शकते कारण यामध्ये घेतलेले घर, जमीन किंवा इतर स्थावर मालमत्ता बँक स्वतःकडे कर्जाच्या कालावधी पर्यन्त गहाण म्हणून ठेवते. हे कर्ज सुरक्षित कर्ज प्रकारामध्ये म्हणजेच Secured Loan मानले जाते.
  • हे कर्ज सुरक्षित असल्या कारणाने यावर व्याजदरही कमी असतो.
  • महिलांसाठी खास व्याजदर सवलत आपण मिळवू शकता.
  • PM आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात १,३०,००० तसेच शहरी भागात १,२०,००० पर्यन्त सवलत मिळू शकते    
  • RBI द्वारे व्याजदरात कपात झाल्यावर आपण कर्जाचे व्याजदर चालू व्याजदराप्रमाणे बदलून घेऊ शकतो. ज्यामुळे व्याजदर कमी झाल्यावर आपल्याला अतिरिक्त फायदा भेटू शकतो.
  • कर्ज परतफेडीसाठी मिळणारा कालावधी हा इतर कोणत्याही कर्जाच्या तुलनेत अधिक असतो.
  • सोयीस्कर कर्ज फेडीसाठी तुम्ही अतिरिक्त रक्कम भरून कर्जाची रक्कम लवकर परतफेड करू शकता.
  • होम लोनमुळे इन्कम टॅक्स मध्ये सवलत घेऊ शकतो.

होम लोनसाठी महत्वाची कागदपत्रे (Documents Required For Home Loan in Marathi)

सर्व बँक साधारणतः एक सारखेच कागदपत्र होम लोन साठी मागतात परंतु काही ठराविक बँकामध्ये अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते. खाली सर्वसाधारण कागदपत्रांची यादी आहे. जर आपण कर्ज घेणार असाल तर आपल्या बँकेत दिल्या जाणाऱ्या कागदपत्रांची चौकशी करून घेणे.

  • बँकेचा अर्ज तुमच्या संपूर्ण महितीसाहित
  • पासपोर्ट फोटो
  • KYC डॉक्युमेंट (ओळखीचा आणि रहिवासी पुरावा)
  • ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • कर्ज प्रक्रिया शुल्क चेक
  • घराचे / जागेचे कागदपत्र
  • नोकरी करणाऱ्याना ६ सॅलरी स्लिप
  • व्यवसाय करणाऱ्याना इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटमेंट ३ वर्षांपर्यंतचे
  • घर बांधकाम करणार असेलतर घराचा आराखडा

होम लोन साठी आवश्यक पात्रता (Eligibility for Home Loan in Marathi)

होम लोनसाठी पात्रता बँक ते बँक वेगळी असू शकते. कर्जाची पात्रता कर्जाच्या प्रकारानुसार तसेच अर्जदाराच्या उत्पन्न प्रकार, स्थावर मालमत्ता आणि विकत किंवा बांधकाम करणाऱ्या घराच्या एकूण किमतीवर अवलंबून असू शकते.   सर्वसाधारण पात्रता पुढीलप्रमाणे :

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदाराचे वय २१ ते ७० असावे. (वयाची अट गृह कर्जाच्या आणि उत्पन्नाच्या प्रकारानुसार बदलू शकते.)
  • अर्जदाराचा किमान क्रेडिट स्कोर ७५० किंवा त्याहून अधिक असावा.
  • नोकरी करणारा अर्जदार साधारणतः ३ वर्षाहून अधिक नोकरी करणारा असावा.
  • स्वयंरोजगार करणारा अर्जदाराचा व्यवसाय किमान ३ ते ५ वर्षहून अधिक असावा.
  • अर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न २५,००० रुपये असावे.

होम लोन साठी अर्ज कसा करावा? (How to Apply for Home Loan in Marathi)

आपण होम लोन ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन घेऊ शकता. आजच्या काळात सर्वच बँका ऑनलाइन अर्जाद्वारे देखील कर्ज प्रक्रिया पूर्ण करतात. जर आपल्याला ऑनलाइन प्रक्रिया जमत नसेलतर प्रत्यक्ष बँकेत जाऊन अर्ज करू शकता.

  • अर्ज करताना संपूर्ण महितीसह आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे बँक आपल्याकडून जमा करून घेते.
  • सर्व कागदपत्रे पडताळणी करून अर्जदार पात्र असेलतर बँक तुम्हाला दिली जाणारी कर्जाची रक्कम आणि व्याजदर ठरवते.
  • बँकेमार्फत कर्जाचे अगरीमेन्ट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्ज मिळते.

कर्ज देणाऱ्या बँका :

१. SBI Home Loans

२. ICICI Home Finance

३. HDFC Housing Finance

४. Kotak Mahindra Home Loan

५. Tata Capital Home Loan

अश्याच इतरही अनेक बँका आहेत ज्या गृह कर्ज देऊ करतात.

या लोन बद्दल वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारचा कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.

वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

धन्यवाद!

FAQ:

  1. गृह कर्ज वयोमर्यादा काय आहे?

    गृह कर्ज घेण्यासाठी अर्जदार २१ ते ७० वयोगटातला असावा. वय मर्यादा कर्जाच्या आणि उत्पन्नाच्या प्रकारानुसार बँक ते बँक बदलू शकते.

  2. गृह कर्ज परतफेड कालावधी किती असतो?

    कर्जाचा कालावधी साधारणतः ५ वर्षे ते ३० वर्षे असतो.

  3. बँक किती गृह कर्ज देऊ शकते?

    बँकाकडून किमान ८० टक्के गृह कर्ज दिल्या जाऊ शकते.

  4. गृह कर्जा मध्ये किती सह कर्जदार असू शकतात?

    मुख्य अर्जदारासह अर्जदाराचे इतर नातेवाईक मिळून ७ लोक गृह कर्जा मध्ये सह कर्जदार बनू शकतात.

आमच्या इतर महत्वाच्या पोस्ट :


पोस्ट शेअर करा :

Leave a Comment

Exit mobile version