RBI New Repo Rate Update : रेपो रेट म्हणजे काय? | रेपो रेट वाढीमुळे कर्ज कसे महाग होते? | रेपो रेट वाढल्याचा कोणत्या ग्राहकांना फायदा कसा होऊ शकतो? | रेपो रेट का वाढवावा लागतो? | रेपो रेट माहिती मराठी.
नमस्कार मित्रांनो, आर बी आय (RBI) च्या पतधोरण समितीने ३० सप्टेंबेर रोजी झालेल्या बैठकीत पुनः रेपो दरात वाढ केल्याचे समोर आले आहे. आर बी आय ने ०.५०% दर वाढवला आहे.
नवीन रेपो दर हा ६.१५% झाला आहे. ज्यामुळे सर्व कर्ज आता पुनः एकदा महाग होणार आहेत. रेपो दर वाढल्याने सर्वच बँकांची कर्जाची व्याजदर वाढणार आहेत. त्यामुळे आपल्या कर्जाच्या हफत्या मध्ये देखील वाढ होणार आहे.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात रेपो दर मध्ये ०.५०% दराने वाढ केली होती त्यावेळी हा दर ५.६५% इतका होता.
रेपो रेट म्हणजे काय?
- रेपो दर म्हणजेच सर्व बँका भारतीय रिजर्व बँके कडून ज्या व्याजदराणे कर्ज घेतात त्या व्याजदराला “रेपो रेट” म्हणले जाते.
- रेपो दर वाढीने बँकाना रिजर्व बँके कडून मिळणारे कर्ज महाग होते आणि या कारणाने बँका ग्राहकांच्या कर्जाच्या व्याजदरात देखील वाढ करतात.
- सध्या रेपो दर ०.५०% वाढून आता ६.१५% इतका झाला आहे. हा या वर्षातील सर्वाधिक रेपो दर आहे.
- या उलट बँका जेंव्हा आर बी आय कडे पैसे ठेवतात आणि आर बी आय त्यांना त्यावर व्याज देते त्या व्याजदराला “रिव्हर्स रेपो रेट” म्हणले जाते.
भारताचे आर बी आय गव्हर्नर शक्तिकान्त दास यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे :
१. कोरोना महामारी नंतर सर्वच देशातील अर्थव्यवस्था ढासळली होती. त्यानंतर रशिया युक्रेन युद्धामूळे क्रूड तेलाच्या किमतीत वाढ बघायला मिळाली. याचाच परिणाम पेट्रोल डीजल दरवाढीमद्धे देखील झाला. महागाई सतत वाढत आहे.
२. अंतर राष्ट्रीय बाजार पेठेत डॉलर चे मूल्य वाढत आहे आणि भारतीय रुपयाचे मूल्य खाली पडत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेवर तनाव निर्माण झाला आहे.
३. आयात करणाऱ्या वस्तु रुपयाचे मूल्य घटल्याने महाग होत आहेत. आयात स्वस्त करायची असेलतर रूपयाच्या किंमतित वाढ होणे गरजेचे आहे. असे झालेतरच येणाऱ्या काळात महागाई कमी होईल.
४. सध्याची भारताची आर्थिक परिस्थिति स्थिर आहे परंतु रेपो दर वाढीने ग्राहकांना काही काळ अजून महागाईला सामोरे जावे लागणार आहे.
५. २०२२ मध्ये महागाई दर ६.७% राहण्याचा अंदाज आहे. रेपो रेट वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊन २०२३ पर्यन्त महागाई ६% आणि २०२४ पर्यन्त ५% होण्याची शक्यता वर्तवली आहे.
६. भारताचे राज्यस्तरीय महागाई लक्षात घेत यात सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेपो रेट वाढीचे परिणाम :
रेपो दर वाढीमुळे सर्वच बँकांना त्यांचे व्याजदर वाढवावे लागणार आहे. यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज तसेच शैक्षणिक कर्ज किंवा इतर कुठलेही कर्ज देखील महाग होणार आहेत.
रेपो दर वाढीमुळे नवीन तसेच जुन्या कर्ज घेतलेल्या ग्राहकांना जास्तीचे EMI द्यावे लागणार आहे.
उदा. जर ५० लाखांचे कर्ज २० वर्षांसाठी घेतले असेलतर २ वर्ष ३ महीने अधिक EMI तुम्हाला द्यावा लागेल.
रेपो रेट वाढीचा फायदा कोणाला?
रेपो दर वाढल्यामुळे कर्जाचे व्याजदर जरी महाग होत असेल तरीही याचा फायदा मुदत ठेव करणाऱ्या ग्राहकांना होऊ शकतो. व्याज दरात वाढ झाल्याने मुदत ठेवीवरील व्याजदर देखील वाढतो आणि याचा फायदा ग्राहकांना होतो.
जर आपणही याचा फायदा घेऊ इच्हीत असाल तर मुदत ठेविचा नक्कीच विचार करू शकता. व्याजदरात वाढ झालीतर PPF तसेच इतर सरकारी मुदत ठेव योजने मध्येही व्याजदर आणखी वाढून ग्राहकांना फायदा होऊ शकतो.
रेपो रेट कमी झाल्यावर कर्जाचे व्याजदर कमी करता येते का? :
रेपो दर वाढीमुळे व्याजदर सर्वच बँका वाढवतात आणि ग्राहकांना ना सांगता आपोआप ही व्याजदर वाढ ग्राहकांच्या कर्जात जोडली जाते.
परंतु या उलट जर रेपो दर कमी झाला आणि बँकेचे व्याजदर कमी झाले तर बँक चालू ग्राहकांना व्याजदर कमी लागू करत नाही. फक्त नवीन ग्राहकांनाच नवीन कमी झालेला व्याजदर देऊ केला जातो.
जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल आणि भविष्यात व्याजदर जर कमी झाला तर तुम्हाला लगेच बँकेत जाऊन व्याजदर कमी करण्यासाठी अर्ज करून काही शुल्क भरून कमी झालेला व्याजदर घेता येतो. यासाठी ग्राहकांनी कायम व्याजदरात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेऊन असले पाहिजे. ज्यामुळे व्याजदरात भेटलेल्या सवलतीचा तुम्ही फायदा घेऊ शकता.
रेपो रेट मध्ये झालेले बदल एप्रिल २०१२ पासून सप्टेंबेर २०२२ पर्यन्त :
रेपो दर तारीख | रेपो दर |
३० सप्टेंबेर २०२२ | ६.१५% |
५ ऑगस्ट २०२२ | ५.६५% |
८ जून २०२२ | ५.१५% |
४ मे २०२२ | ४.६५% |
२२ मे २०२० | ४.२५% |
२७ मार्च २०२० | ४.६५% |
०४ ऑक्टोबर २०१९ | ५.४०% |
०७ ऑगस्ट २०१९ | ५.६५% |
०६ जून २०१९ | ६.००% |
०४ एप्रिल २०१९ | ६.२५% |
०७ फेब्रुवारी २०१९ | ६.५०% |
०१ ऑगस्ट २०१८ | ६.७५% |
०६ जून २०१८ | ६.५०% |
०२ ऑगस्ट २०१७ | ६.२५% |
०६ एप्रिल २०१६ | ६.५०% |
४ ऑक्टोबर २०१६ | ६.७५% |
५ एप्रिल २०१६ | ७.००% |
२९ सप्टेंबर २०१५ | ७.७५% |
०२ जून २०१५ | ८.२५% |
०४ मार्च २०१५ | ८.५०% |
१५ जानेवारी २०१५ | ८.७५% |
२८ जानेवारी २०१४ | ९.००% |
२९ ऑक्टोबर २०१३ | ८.७५% |
७ ऑक्टोबर २०१३ | ९.०% |
२० सप्टेंबर २०१३ | ९.५०% |
१५ जुलै २०१३ | १०.२५% |
०३ मे २०१३ | ८.२५% |
१९ मार्च २०१३ | ८.५०% |
३० जानेवरी २०१३ | ८.७५% |
२६ एप्रिल २०१२ | ९.००% |
विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s):
-
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो दर म्हणजेच सर्व बँका भारतीय रिजर्व बँके कडून ज्या व्याजदराणे कर्ज घेतात त्या व्याजदराला “रेपो रेट” म्हणले जाते.
-
रेपो रेट वाढीमुळे कर्ज कसे महाग होते?
रेपो दर वाढीने बँकाना रिजर्व बँके कडून मिळणारे कर्ज महाग होते आणि या कारणाने बँका ग्राहकांच्या कर्जाच्या व्याजदरात देखील वाढ करतात.
-
रेपो रेट वाढल्याचा कोणत्या ग्राहकांना फायदा कसा होऊ शकतो?
रेपो दर वाढल्यामुळे कर्जाचे व्याजदर जरी महाग होत असेल तरीही याचा फायदा मुदत ठेव करणाऱ्या ग्राहकांना होऊ शकतो.
-
रेपो रेट का वाढवावा लागतो?
अर्थव्यवस्थेवर येणारा तनाव कमी करण्यासाठी रेपो रेट मध्ये वाढ केली जाऊ शकते.
-
RBI चा सध्याचा नवीन रेपो रेट काय आहे?
RBI चा रेपो दर ३० सेप्टेंबर पासून ०.५०% नि वाढून ५.९०% इतका झाला आहे.
अर्थव्यवस्थेवर येणारा तनाव कमी करण्यासाठी रेपो रेट मध्ये वाढ केली जाऊ शकते.
RBI च्या सर्व माहितीसाठी आपण https://www.rbi.org.in/ या संकेतस्थळावर जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता.
वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारच कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.
वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
धन्यवाद!
आमच्या इतर महत्वाच्या पोस्ट :
- PM मुद्रा लोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
- Navi App Loan कसे काढावे?
- Money Tap App द्वारे कर्ज कसे काढावे?
- शैक्षणिक कर्ज कसे काढावे?
- पर्सनल ओवरड्राफ्ट लोन म्हणजे काय?
- Home Loan बद्दल सविस्तर माहिती
- विद्यालक्ष्मी शिक्षण कर्ज योजना
- कार लोन साठी टॉप १० बँका, वैशिष्ट्ये, पात्रता, प्रक्रिया शुल्क आणि निकष