पर्सनल ओवरड्राफ्ट लोन म्हणजे काय आहे? | Important: How to apply for a Quick Personal Overdraft loan?
नमस्कार मित्रांनो, पर्सनल ओवरड्राफ्ट लोन | Personal Overdraft Loan in Marathi बद्दल सविस्तर माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात. आजवर आपण सर्वांनी पर्सनल लोन बद्दल माहिती ऐकलेली आहे. जर आपल्याला पैशांची गरज असेल तर आपण बँकेमधून पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज घेत असतो.
पर्सनल लोन मध्ये आपण जेवढी रक्कम आपल्याला हवी तेवढ्या रकमेसाठी अर्ज करतो. आपण अर्ज केलेली रक्कम बँकेकडून आपल्या खात्यामध्ये जमा होत असते. जमा झालेल्या संपूर्ण रकमेवरती आपल्याला बँक पहिल्या महिन्यापासूनच व्याज आकारायला चालू करते. यात होते असे की आपल्याला घेतलेल्या रकमेच्या जर काही भागच वापरायचा असेल तरी देखील आपल्याला इतर रकमेवर व्याज बँकेला दरमहा द्यावा लागतो. जर आपल्याला फक्त हवी तेवढीच रक्कम वापरायची असेल आणि उरलेली रक्कम आपल्या जमा खात्यात तशीच ठेवायची असेल तरी देखील आपल्याला ही व्याजाची रक्कम बँकेला देणे आवश्यक असते.
नुकताच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन गाईडलाईनुसार पर्सनल ओवर ड्राफ्ट लोन (Personal Overdraft Loan) बँकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. पर्सनल ओवरड्राफ्ट लोन हे पर्सनल लोन सारखेच अर्ज करून आपल्याला घेता येते. हे लोन घेतल्यावर आपण अर्ज केलेली रक्कम आपल्या बँक खात्याच्या वॉलेट मध्ये जमा होते. या वॉलेट मधली रक्कम आपल्याला हवी असल्यास आपण ती आपल्या खात्यात ट्रान्सफर करू शकतो. जेवढी रक्कम आपल्याला हवी आहे आणि ट्रान्सफर केलेली आहे फक्त तेवढ्याच रकमेवर बँक व्याज आकारते. उरलेली वॉलेट मधली रक्कम ही तशीच राहते. त्या रकमेवर बँक कर्ज आकारत नाही. यामुळे ग्राहकांना वॉलेट मधल्या अतिरिक्त रकमेवर व्याज देण्याची गरज नसते.
पर्सनल ओवरड्राफ्ट लोनचे फायदे
- या लोनचे इंटरेस्ट रेट अत्यंत माफक दरात असतात.
- या लोन मध्ये फक्त वापरलेल्या रकमेवरच व्याज द्यावे लागते.
- लोन साठी अर्ज केलेली संपूर्ण रक्कम आपल्या वॉलेटमध्ये जमा राहते यामुळे आपल्याला हवे तेव्हा हवे तेवढी रक्कम काढता येते.
- या फॅसिलिटीमुळे कर्ज घेणे आणि परतफेड करणे हे सोयीस्कर झालेले आहे.
- या मुळे आपली बँकेची क्रेडिट हिस्टरी आपण चांगली बनवू शकतो.
- सोप्या कागदपत्रांच्या पूर्ततेत आपण पर्सनल ओवर ड्राफ्ट लोन घेऊ शकतो.
- लोन वॉलेट मधून आपण हवे तेवढ्या वेळेस पैसे काढू शकतो.
- या वॉलेट मधून आपण ऑनलाइन पैसे देखील पाठवू शकतो.
- या लोन खात्यातून आपण युटिलिटी बिल क्रेडिट कार्ड बिल इलेक्ट्रिसिटी बिल असे अनेक प्रकारचे बिल देखील आपण देऊ शकतो.
- या लोन खात्यावर डिमांड ड्राफ्ट देखील आपण करू शकतो.
पर्सनल ओवर ड्राफ्ट लोन साठी आवश्यक कागदपत्रे | Personal Overdraft Loan required documents
सॅलरी स्लिप | लास्ट ३ महिन्यांची सॅलरी स्लिप |
उत्पन्नाचा पुरावा | बँक स्टेटमेंट |
फोटो पुरावा | वोटर आयडी / पासपोर्ट /ड्रायव्हिंग लायसन्स / आधार कार्ड |
रहिवासी पुरावा | पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स /वोटर आयडी |
पर्सनल ओवर ड्राफ्ट लोन साठी अर्ज कसा करावा
- पर्सनल ओवरड्राफ्ट लोन साठी आपण वैयक्तिक नजीकच्या कोणत्याही बँक शाखेत जाऊन चौकशी करू शकता आणि अर्ज करू शकता.
- या साठी आपण ऑनलाइन फॉर्म भरून देखील अर्ज करू शकता.
- बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाइन फॉर्म भरू शकता.
- यानंतर हवी असलेली रक्कम आणि परतफेडीचा कालावधी निवडावा.
- अर्ज दाखल केल्यानंतर बँक प्रतिनिधी कडून तुम्हाला कॉल करण्यात येतो.
- सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बँक तुम्हाला ओव्हरड्राफ्ट अकाउंट उघडून देते.
- या अकाउंट मध्ये तुम्हाला तुमची उपलब्ध झालेली कर्ज रक्कम देण्यात येते.
पर्सनल ओवरड्राफ्ट लोन देणाऱ्या बँका
- टाटा कॅपिटल फायनान्स (Tata Capital Finance)
- कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
- आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
- बजाज फिंसर्व (Bajaj Finserv)
- एचडीएफसी बँक (HDFC Bank)
- एसबीआय बँक (SBI Bank)
- ॲक्सिस बँक (Axis Bank)
अशाच इतरही बँक आणि वित्त संस्था आहेत ज्या आपल्याला पर्सनल ओवरड्राफ्ट लोन देऊ शकतात. यासाठी आपण नजीकच्या बँक शाखेत जाऊन चौकशी करू शकता.
पर्सनल ओवरड्राफ्ट लोन व्याजदर
लोन व्याजदर हे बँक ते बँक वेगळे आकारलेले असतात. साधारण हे व्याजदर १२% ते १८% इतके आकारले जाऊ शकतात.
पर्सनल ओवरड्राफ्ट लोन कालावधी
लोन कालावधी १२/२४ महिने फिक्स्ड आणि यानंतर ड्रॉपलाईन कालावधी दिलेल्या मुदतीसाठी असतो.
पर्सनल ओव्हरड्राफ्ट लोन व्याजदर आकारणी
या लोन मध्ये दिवसाच्या साधारण व्याज दराने व्याज आकारले जाते. उदाहरणार्थ, जर तुमच्या सॅलरी खात्यात ५००० रुपये बॅलन्स असेल आणि तुम्ही १०००० रुपये ५ दिवसांसाठी काढत असाल तर ५००० रुपये तुमच्या सॅलरी अकाउंट + ५००० रुपये तुमच्या पर्सनल ओव्हरड्राफ्ट लोन अकाउंट = १०००० रुपये असे काढले जातील.
आकारलेले व्याजदर = ५०००*(व्याजदर/१००) * (५/३६५)
Day | Narration | Debit | Credit | Bank Balance | Personal OD Loan Limit |
5000 | 25000 | ||||
Day 1 | Chequ Drawn | -10000 | -5000 | 20000 | |
Day 2 | -5000 | 20000 | |||
Day 3 | -5000 | 20000 | |||
Day 4 | -5000 | 20000 | |||
Day 5 | -5000 | 20000 | |||
Day 6 | Transfer to Account | 10000 | 5000 | 25000 | |
Interest Charged for 5 days only | Rs. 10.27/- | 5000*(15%/100)*(5/365) |
पर्सनल ओवरड्राफ्ट लोन पात्रता
- या साठी आपल्याला सॅलरी अकाउंट असणे महत्त्वाचे आहे.
- आपण सध्याला नोकरी करत असणे बंधनकारक आहे.
- आपली नोकरी किमान तीन महिने जास्त कालावधीची असावी.
- आपली बँक हिस्टरी चांगली असणे गरजेचे आहे.
- आपला सिबिल स्कोर किमान चांगला असणे महत्त्वाचे आहे.
- हे लोन आपल्या सॅलरीच्या चार पटीपर्यंत आपल्याला मिळू शकते.
- सर्व अटी व शर्थ कर्ज देणाऱ्या बँकेनुसार बदलू शकतात.
या लोन बद्दल वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारचा कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.
वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
धन्यवाद!
FAQ :
-
पर्सनल ओवरड्राफ्ट लोन म्हणजे काय?
पर्सनल लोन सारखेच पर्सनल ओवर ड्राफ्ट लोन असून यामध्ये पर्सनल ओवरड्राफ्ट लोन अकाउंट मधून जेवढी रक्कम आपण वापरतो फक्त त्यावरच आपल्याला व्याज बँकेकडून आकारले जाते.
-
पर्सनल ओवरड्राफ्ट लोन चा परतफेड कालावधी किती वर्ष असतो?
पर्सनल ओवरड्राफ्ट लोनचा परतफेड कालावधी हा जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत असतो.
-
पर्सनल ओवरड्राफ्ट लोन साठी पात्रता?
पर्सनल ओवर ड्राफ्ट लोन अर्ज करणारा व्यक्ती किमान वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले असून तीन महिन्यांपेक्षा जास्त नोकरी करणारा असावा.
-
पर्सनल ओवरड्राफ्ट लोन साठी लागणारी कागदपत्रे?
पर्सनल ओवरड्राफ्ट लोन साठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहे. लास्ट तीन महिन्यांची सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, फोटो पुरावा आणि रहिवासी पुरावा.
-
पर्सनल लोन आणि पर्सनल ओवरड्राफ्ट लोन मधील योग्य काय आहे?
जर आपल्याला पर्सनल लोन साठी अर्ज करावयाची रक्कम तात्काळ वापरायची असेल तर आपण पर्सनल लोन घेऊ शकता परंतु जर आपल्याला घेतलेली रक्कम थोडी थोडी करून वापरायची असेल तर आपण पर्सनल ओवर ड्राफ्टलोन साठी निवड करू शकता.
शेती कर्ज २०२२ | कृषी कर्ज | How to apply for Agriculture Loan 2022 बद्दल सविस्तर माहिती.
प्रधानमंत्री मुद्रा योजना २०२२ | PM Mudra Loan Marathi २०२२