मनी टॅप ॲप द्वारे कर्ज कसे काढावे? | Money Tap App Information in Marathi :
नमस्कार मित्रांनो, सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कोविड-१९ नंतरच्या काळात बऱ्याच लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. सध्याच्या महागाईच्या काळात सर्वांवरच आर्थिक ताण तणाव वाढू लागलेला आहे. या काळात बरेच जणांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज असते आर्थिक गरज भासल्यानंतर सर्वप्रथम आपण बँकेकडे धाव घेत असतो. परंतु सर्वच बँका आपल्याला अडचणीत आर्थिक मदत म्हणून कर्ज स्वीकृती देईलच असं नाही. या मागचं कारण म्हणजे बँकेची कार्यप्रणाली आणि बँकेची कर्ज घेण्यासाठी लागणारी पात्रता.
अशा वेळेस कोणाकडे मदत मागावी यासाठी आपण बरेच विचार करतो अशा अडचणीच्या वेळेत आता आपण खूप सोयीस्कर पद्धतीने छोट्या पद्धतीचे आर्थिक कर्ज घेऊ शकतो. सध्या आपण बरेच ठिकाणी बरेच वेळेस ऐकले असेल लोन ॲप्स बद्दल. सध्या मार्केटमध्ये अनेक प्रकारचे लोन ॲप्स उपलब्ध आहेत या ॲप्स च्या माध्यमातून अगदी सहजपणे ठराविक काळासाठी आपण काही रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो. अशा ॲप्स पैकीच Money Tap ॲप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहे Money Tap? :
Money Tap हे भारतातील एक अधिकृत क्रेडिट देणारे ॲप आहे. या ॲप मधून अगदी सोप्या पद्धतीने आपण कर्ज घेऊ शकतो. हे एक पर्सनल लोन ॲप आहे जे ग्राहकांना कर्ज मर्यादित काळासाठी देण्यास मदत करते. हे ॲप इन्स्टंट पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड या माध्यमातून आपण उपलब्ध करू शकता. हे ॲप सध्या महाराष्ट्रातील सर्व मुख्य शहरांमध्ये काम करत आहे.
- Money Tap ॲप द्वारे आपण ५ लाखांपर्यंत ऑनलाईन क्रेडिट लाईन घेऊ शकता.
- हे कर्ज तुम्ही ३६ महिन्यांच्या मुदतीपर्यंत परत करू शकता.
- या कर्जाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये जेवढी आपल्याला मंजूर लिमिट आहे, त्यापैकी जेवढी रक्कम आपण वापरली त्या रकमेवरच आपल्याला व्याज द्यावे लागते.
- यामुळेच भारतात या ॲपला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आपल्यालाही या ॲपद्वारे कर्ज हवे असेल तर आजच ऑनलाईन किंवा मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे आपण अर्ज करू शकता.
या ॲप ची अधिकृत संकेत स्थळाची लिंक दिलेली आहे. आपण यावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता. https://www.moneytap.com/
Money Tap ॲप द्वारे कर्जासाठी अर्ज कसा करावा? :
- स्टेप १ : मनीटॅप क्रेडिट लाइन ॲप डाउनलोड करा आणि नोंदणी करा.
सोप्या आणि सुरक्षित नोंदणी प्रक्रियेद्वारे तुम्हाला तुमचे वय, शहर, पॅन क्रमांक, उत्पन्न अशी योग्य ती माहिती भरा.
यामुळे मनीटॅप क्रेडिट लाइनसाठी तुमची पात्रता निश्चित केली जाईल. - स्टेप २ : अंतिम मंजुरीसाठी योग्य ती केवायसी कागदपत्रे अपलोड करा.
- स्टेप ३ : अर्ज मंजुरी नंतर तुम्हाला तुमची मंजूर झालेली रक्कम त्वरित सनीतली जाईल.
हि रक्कम तुम्ही रोख किंवा कार्ड मधून एका टॅपने तुम्ही वापरू शकता. - स्टेप ४ : वापरलेली रक्कम तुम्ही EMI मध्ये रूपांतरित करण्यासाठी वॉर जाऊन परत फेडीची मुदत नोंदवू शकता.
- स्टेप ५ : तुमच्या सर्व व्यवहारांचा तपशील तुम्ही अँप द्वारे बघू शकता.
Money Tap ॲप चे फायदे :
- Money Tap ॲप हे RBI द्वारे शासित भारतातील नियमन केलेल्या वित्तीय संस्थांसोबत काम करते आणि चा स्वतःचा NBFC परवाना देखील आहे.
- त्यामुळे हे चांगले नियमन करते आणि कायदेशीररित्या पालन करते.
- तुमच्या मंजूर मर्यादेपासून २४/७ कितीही रक्कम उधार घ्या.
- तुमचे मनीटॅप क्रेडिट कार्ड कुठेही, कधीही वापरा.
- यापुढे आणीबाणीसाठी तुम्हाला कोणाकडेही उधार मागण्याची गरज नाही!
- एका टॅपने वरूनच तुमची घेतलेली रक्कम EMI मध्ये परत करता येईल.
- तुमच्या मनीटॅप खात्यातूनच तुमचे सर्व व्यवहार आणि तपशील, EMI आणि उपलब्ध क्रेडिट मर्यादा यांचा तपशील तुम्हाला ठेवता येईल.
Money Tap ॲप ची पात्रता? :
- मनीटॅप वय मर्यादा : अर्जदाराची पात्र वय मर्यादा हि २३ वर्षांपेक्षा जास्त आणि ५५ वर्षांपेक्षा कमी असावी.
- पगार : अर्जदाराचा किमान पगार हातात ₹ ३०,०००/ प्रति महिना असावा.
- रोजगाराचे स्वरूप : नोकरी करणारा अर्जदार हा ₹ ३०,०००/- च्या किमान मासिक पगार असणारा असावा.
- स्वयंरोजगार : ₹ ३०,०००/- च्या किमान उत्पन्नासह व्यावसायिक, जसे की डॉक्टर, वकील, दुकान मालक, व्यवसाय मालक इ.
- पात्र नसलेले अर्जदार : मॅन्युअल मजूर, कुशल कामगार, चहाचे स्टॉल/ज्यूस/पान/बुचर दुकान मालक, केअरटेकर, लोको पायलट, ड्रायव्हर्स, लॅब अटेंडंट, हवालदार, शिपाई, कॉन्स्टेबल, ऑफिस असिस्टंट, प्रॉपर्टी डीलर, ट्रॅव्हल एजंट, कंत्राटदार, ज्योतिषी, योग/जिम प्रशिक्षक, पुजारी, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि दलाल हे या कर्जासाठी अपात्र असतील.
- कामाचा अनुभव आणि कालावधी:
- नोकरी अर्जदार : एकाच नोकरीत ६ महिने आणि एकूण २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
- स्वयंरोजगार: ३ वर्षांच्या कामाच्या अनुभवासह किमान ३ वर्षे व्यवसायात असणे आवश्यक आहे.
Money Tap ॲप द्वारे कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- पॅन कार्ड क्रमांक
- व्यावसायिक सेल्फी
(Money Tap ॲप मध्ये घेतलेला) - पत्ता पुरावा
(वैध ड्रायव्हिंग लायसन्स / वैध पासपोर्ट / आधार कार्ड) - आयडी प्रूफ
(वैध ड्रायव्हिंग लायसन्स / वैध पासपोर्ट / मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / पॅन कार्ड)
Money Tap ॲप ची सेवा फक्त पुढील शहरांमध्ये उपलब्ध आहे :
तुम्ही खालीलपैकी कोणत्याही शहराचे रहिवासी असणे आवश्यक आहे:
अहमदाबाद, अंबाला, आनंद, औरंगाबाद, बेंगळुरू, भरूच, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, डेहराडून, दिल्ली, इरोड, फरीदाबाद, गांधीनगर, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुंटूर, गुडगाव, गुवाहाटी, हरिद्वार, हैदराबाद, इंदूर, जयपूर , जोधपूर, कोची, कोल्हापूर, कोलकाता, लखनौ, मंगलोर, मोहाली, मुंबई, म्हैसूर, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, नोएडा, पंचकुला, पुणे, रायपूर, राजकोट, सेलम, सिकंदराबाद, सुरत, ठाणे, तिरुपती, त्रिची, वडोदरा, विजयवाडा, विशाखापट्टणम.
Money Tap ॲप बद्दलची वरील सर्व माहिती Money Tap च्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतलेली असून हि पोस्ट फक्त माहिती साठी देण्यात आलेली आहे. जर आपल्याला कसलेही कर्ज हवे असेलतर आधी अधिकृतरीत्या सर्व चौकशी करूनच अर्ज करा. जर आपण Money Tap ॲप वापरत असाल तर आपला अनुभव आपण कमेंट बॉक्स मध्ये शेअर करू शकता.
आजची माहिती आपल्याला कशी वाटली यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यावी.
धन्यवाद!
FAQ :
-
Money Tap ॲप ची वय मर्यादा काय आहे?
अर्जदाराची पात्र वय मर्यादा हि २३ वर्षांपेक्षा जास्त आणि ५५ वर्षांपेक्षा कमी असावी.
-
Money Tap ॲप ची पगार पात्रता?
अर्जदाराचा किमान पगार हातात ₹ ३०,०००/- प्रति महिना असावा.
-
Money Tap ॲप ची सेवा कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे?
अहमदाबाद, अंबाला, आनंद, औरंगाबाद, बेंगळुरू, भरूच, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, डेहराडून, दिल्ली, इरोड, फरीदाबाद, गांधीनगर, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुंटूर, गुडगाव, गुवाहाटी, हरिद्वार, हैदराबाद, इंदूर, जयपूर , जोधपूर, कोची, कोल्हापूर, कोलकाता, लखनौ, मंगलोर, मोहाली, मुंबई, म्हैसूर, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, नोएडा, पंचकुला, पुणे, रायपूर, राजकोट, सेलम, सिकंदराबाद, सुरत, ठाणे, तिरुपती, त्रिची, वडोदरा, विजयवाडा, विशाखापट्टणम.
-
Money Tap ॲप द्वारे आपण किती ऑनलाईन क्रेडिट लाईन घेऊ शकतो?
Money Tap ॲप द्वारे आपण ५ लाखांपर्यंत ऑनलाईन क्रेडिट लाईन घेऊ शकता.
-
Money Tap ॲप घेतलेले कर्ज किती EMI मध्ये परतफेड करता येते?
हे कर्ज तुम्ही ३६ महिन्यांच्या मुदतीपर्यंत परत करू शकता.
अधिक माहितीसाठी वाचा :
प्रधानमंत्री मुद्रा लोन संदर्भात जाणून घ्या.
काय असते पर्सनल ओवरड्राफ्ट लोन?
शेत कर्जासाठी अर्ज कसा करावा?