शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे संपूर्ण माहिती मराठीत | Get a Quick Educational Loan Information in Marathi:
नमस्कार मित्रांनो, आजच्या महागाईच्या वाढत्या काळात चांगले शिक्षण घेणे अत्यंत कठीण झाले आहे. सर्व सामान्य विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेणे कठीण झाले. याचे कारण म्हणजे शिक्षण संस्थांची फी आवाक्याबाहेर असणे. अश्या परिस्थितिमध्ये शैक्षणिक कर्ज म्हणजेच Educational Loan घेणे हाच एक सोयीचा पर्याय आहे.
शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे? (How to get Educational Loan?), शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असतात? (Documents required for Educational Loan?), शैक्षणिक कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण बघणार आहोत.
शैक्षणिक कर्ज ही ज्या विद्यार्थ्याना पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण भारतात किंवा परडदेशत घ्यायचे आहे परंतु त्यांची आर्थिक परिस्थिति ठीक नाही आशावेळेस बँक विद्यार्थ्याना शैक्षणिक कर्ज देऊ करते. शैक्षणिक कर्ज ही शिक्षण घेण्यासाठी भेटते आणि शिक्षणाचा कालावधी संपूर्ण झाल्यावर काही ठराविक कालावधी नंतर आपण परतफेड करू शकतो.
SBI ही भारतातील शैक्षणिक कर्ज देणारी एक अग्रगण्य बँक असून विविध प्रकारचे शैक्षणिक कर्ज बँकेमार्फत देण्यात येते. एसबीआय विद्यार्थी ऋण योजना, स्कॉलर ऋण म्हणजेच ज्या विद्यार्थ्याना आयआयटी, आयआयएम, एनआयटी सारख्या उच्च शिक्षणस कर्ज, विदेश शिक्षण कर्ज योजना ७.५० लाखांहून अधिक, स्किल लोन १.५ लाखांपर्यंत, डॉ. आंबेडकर व्याज सबसिडी योजना अश्या अनेक विविध योजना आपण घेऊ शकतो.
इतरही अनेक बँक महाराष्ट्रात आणि भारतात उपलब्ध आहेत जे शैक्षणिक कर्ज विविध योजनांच्या मार्फत उपलब्ध करून देतात. शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पात्रता काय असते आपण बघूयात.
शैक्षणिक कर्जाचे फायदे? Benefits of Educational Loan :
शैक्षणिक कर्ज घेणे अनेकदा बरेचजन अवघड समजतात आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर कर्जाची परतफेड कशी करणार याचा विचार करून शैक्षणिक कर्ज घेणे टाळतात. पण शैक्षणिक कर्जाचे अनेक फायदे देखील आहेत. जसे की,
- शैक्षणिक कर्ज ही कर्ज नसून भविष्यासाठी केलेली एक प्रकारची गुंतवणूक आपण समजू शकतो.
- शैक्षणिक कर्ज घेऊन आपण नामांकित विद्यापीठाची पदवी शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो.
- शैक्षणिक कर्ज घेतल्यावर लगेचच परतावा करण्याची आवश्यकता नसते. शिक्षण पूर्ण झाल्यावर किमान एक वर्ष नंतर आपण कर्जाची परतफेड करू शकतो.
- शैक्षणिक कर्ज परतफेड करताना दिलेल्या व्याजाची रक्कम नंतर इन्कम टॅक्स मध्ये आपण कमी करून घेऊ शकतो.
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे? Documents for Educational Loan :
- KYC साठी लागणारी कागदपत्रे
- बँक स्टेटमेंट / पास बूक ६ महिन्यांचे
- ग्यारंटर फॉर्म – पर्यायी (Optional)
- महाविद्यालयाची फी परतफेड करण्याचे वेळापत्रक आणि प्रवेशाची प्रत
- SSC, HSC, पदवी अभ्यासक्रमांची गुणपत्रिक / उत्तीर्ण प्रमाणपत्रे
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा? How to apply for Educational Loan :
शैक्षणिक कर्ज घेणे अगदी सोपे आणि सोयीस्कर आहे.
- सर्वप्रथम बँक शाखेत जाऊन कर्जाचा अर्ज पूर्ण भरावा
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत
- त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल
- सादर केलेले कागदपत्रे आणि अर्ज संपूर्ण योग्य असेलतर तुमचा अर्ज मंजूर केला जाइल व कर्ज दिले जाइल.
शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी पात्रता? Eligibility for Educational loan :
- अर्जदार भारताचा नागरिक असावा
- अर्जदाराचे किमान वय १८ ते ३५ च्या दरम्यान असावे
- अर्जदाराचे शैक्षणिक रेकॉर्ड उत्तम असावा
- अर्जदार किमान पदवी / पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अर्ज करणार असावा
- कर्जाच्या रकमेणूसार हमीदार आणि परिवारांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध असावा
शैक्षणिक कर्ज परतफेड कालावधी? Educational Loan EMI Duration :
शैक्षणिक कर्जाची परतफेड साधारणतः शिक्षणाचा कालावधी संपूर्ण झाल्यावर एक वर्षांच्या नंतर पुढील १५ वर्षांपर्यंत व्याजाच्या रकमेणूसार अवलंबून असतो.
शैक्षणिक कर्जाचे व्याजदर? Educational Loan Interest rate :
किमान व्याजदर हे ८.००% प्रती वर्ष किंवा अधिक असू शकते
शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या? Educational Loan Provider Banks :
शैक्षणिक कर्ज ही साधारणतः सर्व राष्ट्रीयकृत बँकेत मिळते. काही महत्वाच्या कर्ज देणाऱ्या बँका खालीलप्रमाणे आहेत. या सर्व बँका मध्ये जाऊन आपण शैक्षणिक कर्जाची चौकशी करू शकता.
- SBI
- PNB
- Axis
- Bank of Baroda
- HDFC
- Kotak Mahindra Bank
- Federal Bank
- Union Bank of India
- Bank of Maharashtra
- Tata Capital
- IDFC First Bank
- Canara Bank
या लोन बद्दल वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारचा कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.
वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
धन्यवाद!
FAQ
-
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी कोणती बँक चांगली आहे?
सर्व राष्ट्रीयकृत बँका शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी सोयीस्कर ठरतात.
-
शैक्षणिक कर्ज किती मिळू शकते?
अंदाजे ४ लाखांपासून २५ लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज आपण घेऊ शकता.
-
शैक्षणिक कर्ज ०% व्याजदरात घेता येतेकां?
नाही.
-
शैक्षणिक कर्जासाठी सरकारची कोणती योजना आहे?
विद्या लक्ष्मी पोर्टल द्वारे आपण सरकारच्या शैक्षणिक कर्ज योजना आपण घेऊ शकतो.
-
शैक्षणिक कर्ज वयोमार्याद काय आहे?
किमान १८ वर्ष ते ३५ वर्ष वयोगटातला अर्जदार असावा.
इतर कर्ज माहिती सविस्तर जाणून घ्या :
Navi Loan App Loan in 1 Hour | १ तासांच्या आत Quick Personal Loan
Money Tap अँप द्वारे लोन कसे काढावे.
शेती कर्जविषयी माहिती जाणून घ्या.
PM मुद्रा लोन विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
पर्सनल Overdraft लोन म्हणजे काय?