PMSY : PM Svanidhi Yojana | प्रधानमंत्री स्वनिधी योजना :
नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांना माहीतच आहे कोविड-१९ म्हणजेच करोना वायरस मुळे सामान्य माणसांच जीवन विस्कळीत झाले. छोटे व्यापारी किंवा रस्त्यांवर विक्री व्यवसाय करणाऱ्या सर्वांना कोविड मुळे उद्भवलेल्या परिस्थितीने हतबल केले. कमाईचे साधन अनेकांना बंद देखील करावे लागले. अशातच अनेकांचे नुकसान झाल्याने व्यवसाय देखील बंद करावे लागले. ही सर्व परिस्थिति लक्षात घेऊन प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी १ जून २०२० मध्ये पीएम स्वनिधी योजना सुरू केली.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना उद्देश :
पीएम स्वनिधी योजने द्वारे देशातील रस्त्यावरील विक्रेते, छोटे दुकानदार ज्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे अश्या सर्वच खालच्या स्तरातील व्यवसाय करणाऱ्या लोकांना स्वतःच काम नव्याने सुरू करता यावे यासाठी केंद्र सरकार कडून १०००० रु. पर्यन्त कर्ज देऊ केले जातील. हे कर्ज अल्प व्याजदरात उपलब्ध होते. तसेच कर्जाचे मासिक हफ्ते योग्य भरणा केल्यावर कर्जाचे व्याज सबसिडी रूपात कर्जधारकाच्या खात्यात जमा केले जाते.
PM SVANidhi Yojana म्हणजेच प्रधानमंत्री स्ट्रीट वेन्डर आत्मनिर्भर निधी योजना देखील याला संबोधले जाते.
आज आपण PM SVANidhi Yojana म्हणजेच प्रधानमंत्री स्वनिधी योजना बद्दल सर्व माहिती म्हणजेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसे करावे, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय असतील तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजना पात्रता काय आहे हे जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव | पीएम स्वनिधी योजना |
सुरुवात | प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते |
उद्देश | सर्व खालच्या स्तरातील व्यवसाय करणाऱ्या गरजू लोकाना तत्काल कर्ज उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | रस्त्याच्या कडेला विक्री व्यवसाय करणारे सर्व हातगाडी चालक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि इतर सामान विक्री करणारे |
लाभ | तत्काल १०००० रु. पर्यन्त कर्ज, परतफेड योग्य करणाऱ्या लोकांना सबसिडी म्हणून व्याजाची रक्कम परत मिळणार |
सुरुवात तारीख | १ जून २०२० |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.pmsvanidhi.mohua.gov.in/ |
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे लाभ :
पीएम स्वनिधी योजने अंतर्गत सर्व छोट्या स्तरातील रस्त्याच्या कडेला विक्री करणाऱ्या किंवा छोटे दुकान चालवणाऱ्या व्यावसायिक लोकांना लाभ मिळणार आहे.
१०००० रु. पर्यन्त तत्काळ अर्थसाहाय्य मिळावे यासाठी ही योजना बनविण्यात आलेली आहे.
करोना महामारी च्या काळात अनेक खालच्या स्तरातील व्यवसाय करणाऱ्या लोकांना स्वतःचे व्यवसाय बंद करावे लागले. परंतु उपजीविकेचे साधन असल्या कारणाने नंतर पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती. यासाठीच अश्या व्यावसायिक लोकांना कर्ज उपलब्ध करून त्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे.
हे कर्ज अत्यंत माफक व्याजदरात उपलब्ध आहे. तसेच या कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या लोकांना इतर आणखी योजनेत सहभागी होता येणार आहे. तसेच व्याजदराची रक्कम सबसिडी म्हणून कर्ज घेणाऱ्यांना परत मिळणार आहे.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेस पात्र लाभार्थी :
१. स्ट्रीट फूड विक्रेते
२. चहा विक्रेते
३. फळ विक्रेते
४. भाजी विक्रेते
५. पान टपरी चालवणारे
६. चप्पल बूट दुरुस्ती करणारे
७. न्हावी दुकान चालवणारे
८. कपडे धुणे व इस्त्री दुकान चालवणारे
९. सर्व फेरीवाले
१०. रस्त्यावर विक्री करणारे सर्व छोटे व्यवसाईक
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी आवश्यक बाबी :
१. अर्जदाराचा मोबाइल नं. आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
२. अर्जदारांकडे वेन्डर लायसेंस असणे आवश्यक आहे.
३. अर्ज सादर करण्याआधी अर्बन लोकल बॉडी म्हणजेच ULB सर्वेक्षण मध्ये समाविष्ट होणे अनिवार्य आहे.
४. अर्बन लोकल बॉडी मध्ये समाविष्ट असल्यास स्वनिधी पोर्टल वर आपला सर्वेक्षण नं. तपासा आणि उपलब्ध असल्यास अर्ज करताना प्रविष्ट करा.
५. जर अर्बन बॉडी सर्वेक्षण मध्ये समाविष्ट नसेलतर टाउन व्हेंडिंग कमिटी द्वारे वेंडिंग प्रमाणपत्र (CoV) किंवा ओळखपत्र (आयडी कार्ड) जारी केले गेले असावे.
६. विक्रेत्यांना आपल्या श्रेणी मधून अर्ज करताना पुढे सर्व श्रेणी दिलेल्या आहेत त्यानुसार आवश्यक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेस अर्जासाठी नियुक्त श्रेणी :
श्रेणी | विक्रेता स्टेटस | विक्रेत्याकडून आवश्यक कारवाई |
A | विक्रेत्याला अर्बन लोकल बॉडी (ULB) च्या सर्वेक्षणात समाविष्ट केले गेले आहे आणि ULB किंवा टाउन व्हेंडिंग कमिटी द्वारे वेंडिंग प्रमाणपत्र (CoV) किंवा ओळखपत्र (आयडी कार्ड) जारी केले गेले आहे. | पोर्टलवरील सर्वेक्षण सूचीमध्ये तुमचे नाव तपासा आणि तुमचा सर्वेक्षण संदर्भ क्रमांक (SRN) लक्षात ठेवा.अर्ज प्रक्रियेदरम्यान अपलोड करण्यासाठी तुमच्या CoV किंवा आयडी कार्डची प्रत तयार ठेवा. |
B | विक्रेत्याला अर्बन लोकल बॉडी (ULB) च्या सर्वेक्षणात समाविष्ट केले गेले आहे आणि ULB किंवा टाउन व्हेंडिंग कमिटीद्वारे वेंडिंगचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र जारी केलेले नाही. | पोर्टलवरील सर्वेक्षण सूचीमध्ये तुमचे नाव तपासा आणि तुमचा सर्वेक्षण संदर्भ क्रमांक (SRN) लक्षात ठेवा.ऑनलाइन अर्ज करताना प्रणालीद्वारे तुमच्यासाठी एक तात्पुरती CoV तयार केली जाईल. |
C | रस्त्यावरील विक्रेते, ULB-नेतृत्वाखालील ओळख सर्वेक्षणातून बाहेर पडलेले किंवा ज्यांनी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरू केली आहे.2 उपश्रेणी असतील: | |
C1 : विक्रेत्याला ULB/TVC द्वारे शिफारस पत्र जारी केले आहे. | अपलोड करण्यासाठी LoR ची एक प्रत तयार ठेवा. | |
C2 : विक्रेत्याला LoR जारी केलेला नाही. | खालीलपैकी एक घोषित करण्यासाठी विक्रेता:i कोविड लॉकडाऊन दरम्यान विक्रेत्याला एक वेळ मदत मिळाली आहेii विक्रेता हा व्हेंडिंग/ हॉकर्स असोसिएशनचा सदस्य आहे. | |
D | आजूबाजूच्या विकासाचे/पेरी-शहरी/ग्रामीण भागातील रस्त्यावरील विक्रेते ULB च्या भौगोलिक मर्यादेत विक्री करतात (सर्वेक्षणात समाविष्ट नाही)2 उपश्रेणी असतील: | |
D1 : विक्रेत्याला ULB/TVC द्वारे शिफारस पत्र जारी केले आहे. | अपलोड करण्यासाठी LoR ची एक प्रत तयार ठेवा. | |
D2 : विक्रेत्याला LoR जारी करण्यात आलेला नाही. | खालीलपैकी एक घोषित करण्यासाठी विक्रेता:i कोविड लॉकडाऊन दरम्यान विक्रेत्याला एक वेळ मदत मिळाली आहे.ii विक्रेता हा व्हेंडिंग/ हॉकर्स असोसिएशनचा सदस्य आहे. |
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा :
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
१. अर्ज भरण्यासाठी प्रथम https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या संकेतस्थळाला सुरू करा.
२. नंतर Apply Loan 10K या ऑप्शन वर क्लिक करा.
३. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपेन होईल. यानंतर तुमचा मोबाइल नं. प्रविष्ट करा. तुमच्या मो. नं. वर एक OTP येईल तो प्रविष्ट करून अर्ज ओपेन करा.
४. अर्जातील तपशील भरून तुमचे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा आणि अर्ज सबमीट करा.
५. ऑनलाइन पद्धतीने जर अर्ज सादर करता येत नसेल तर आपण ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज सादर करू शकता. यासाठी नजीकच्या लेंडर्स ऑफिस म्हणजेच कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँक किंवा संस्था मध्ये आपण आपला कर्ज सादर करू शकता.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना असणाऱ्या काही बँक आणि त्यांचे व्याजदर :
१. SBI / एसबीआय / स्टेट बँक ऑफ इंडिया : भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक म्हणून ओळखली जाणारी SBI बँक स्वनिधी योजने अंतर्गत ९.९% पर्यन्त व्याजदारणे कर्ज उपलब्ध करून देते.
२. पंजाब नॅशनल बँक : बँकेचे स्वनिधी योजनेसाठी व्याजदर माफक असून ही ६.९% पासून सुरू होते.
३. यूनियन बँक ऑफ इंडिया : बँकेचे स्वनिधी योजनेसाठी व्याजदर ७.३% पासून आहे.
४. इंडियन ओवर्सीस बँक : बँकेचे स्वनिधी योजनेसाठी व्याजदर ८.१% पासून आहे.
५. बँक ऑफ बरोदा : बँकेचे स्वनिधी योजनेसाठी व्याजदर साधारण १२.७% पर्यन्त आहे.
६. बँक ऑफ महाराष्ट्र : बँकेचे स्वनिधी योजनेसाठी व्याजदर साधारण ७% ते ८% इतके आहे.
इतरही अनेक क्षेत्रीय कर्ज देणाऱ्या संस्था, प्रायवेट बँक किंवा संस्था, को. ऑप. बँक आहेत ज्या स्वनिधी योजने अंतर्गत कर्ज देण्यास सहाय्य करतात. आपण स्वनिधी पोर्टल वर जाऊन नजीकच्या कर्ज देणाऱ्या संस्थेचा पत्ता घेऊ शकता.
प्रधानमंत्री स्वनिधी योजने बाबत काही प्रश्न :
-
प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतिम तारीख ?
प्रधानमंत्री स्वनिधी योजना २४ डिसेंबर २०२४ पर्यन्त वाढवण्यात आलेली आहे.
-
प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणासाठी आहे ?
प्रधानमंत्री स्वनिधी योजना रस्त्यावरील पथ विक्रेते तसेच छोटे दुकानदार यासाठी पात्र आहेत.
-
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची पात्रता काय आहे ?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी स्ट्रीट वेन्डर लायसेंस असणे आवश्यक आहे. इतर पात्रता आपण वरील दिलेल्या माहितीत बघू शकता.
-
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमद्धे किती रक्कम कर्ज म्हणून घेत येते ?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमद्धे आपण सुरुवातीस १०००० रु. पर्यन्त कर्ज घेऊ शकता. कर्ज योग्य पद्धतीने परतफेड केल्यास २०००० रु. ते ५०००० रु. पर्यन्त कर्ज घेता येऊ शकते.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना २४ डिसेंबर २०२४ पर्यन्त वाढवण्यात आलेली आहे. या योजनेसंदर्भात दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर आपल्याला अधिक काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट करून विचारू शकता तसेच अधिकृत पोर्टल वर सर्व माहिती देखील आपण बघू शकता.
वरील सर्व माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारचा कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.
धन्यवाद!
आमच्या इतर महत्वाच्या पोस्ट :
- PM मुद्रा लोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
- Navi App Loan कसे काढावे?
- Money Tap App द्वारे कर्ज कसे काढावे?
- शैक्षणिक कर्ज कसे काढावे?
- पर्सनल ओवरड्राफ्ट लोन म्हणजे काय?
- Home Loan बद्दल सविस्तर माहिती