सोने तारण कर्ज घेण्यासाठी पात्रता, कागदपत्रे, सोने तारण कर्ज कसे घ्यावे?
नमस्कार मित्रांनो, भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक असणाऱ्या देशांपैकी एक मानल्या जातो. भारतात दरवर्षी सोने खरेदी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजेच भारतात सोन्याच्या दागिन्यांना असणारे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व.
सांस्कृतिक म्हणजेच सोन्याचे दागिने परिधान करण्यात भारतीय स्त्रियांचे स्त्रीधन म्हणून मानले जाणे. तसेच आर्थिक म्हणजेच सोन्याचे दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तु आर्थिक गुंतवणूक म्हणून वापरले जाणे.
सोन्याचे दागिने किंवा वस्तु ही सर्व सामान्य माणसांकडे असलेली एक आर्थिक गुंतवणूकच म्हणत येईल. कारण म्हणजे याच आर्थिक गुंतवणुकीचा आर्थिक अडचणीत अत्यंत सोप्या पद्धतीने वापरता येणे. अनेक जन अडचणीच्या काळात सोन्याचा वापर पैसा मिळवण्यासाठी अगदी सहज करतात.
आधीच्या काळात सोने विकून आर्थिक गरज भागवणे ही जुनी पद्धत अस्तित्वात होती परंतु हल्लीच्या काळात याच सोन्यावर कर्ज घेणे हा एक पर्याय आता सर्वांसाठी उपलब्ध झालेला आहे.
आज याच “सोने तारण कर्ज” म्हणजेच “गोल्ड लोन” बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात.
सोने तारण कर्ज म्हणजेच गोल्ड लोन म्हणजे काय ? | What is Gold Loan in Marathi?
सोने कर्ज म्हणजेच सोने तारण ठेवून त्याबदल्यात कर्ज म्हणून ठराविक रक्कम घेणे आणि तीच रक्कम आर्थिक अडचण दूर झाल्यावर परतफेड करून आपले सोने पुनः आपल्याकडे जसेच्या तसे परत घेणे. अगदी साधा आणि सरळ मार्गाने हे कर्ज खूपच कमी कालावधीत घेता येत असल्यामुळे हल्ली लोकांमध्ये सोने तारण कर्ज म्हणजेच गोल्ड लोन हे खूपच लोकप्रिय झाले आहे.
सोने तारण कर्ज म्हणजे गोल्ड लोन हे एक सेक्युरड लोन म्हणजेच सुरक्षित कर्ज म्हणून मानले जाते. गोल्ड लोन मध्ये तुमचे सोने ही स्थावर मालमत्ता म्हणून बँकेकडे गहाण ठेवण्यात येते. त्याबदल्यात सोन्याच्या रकमेच्या किमान ७५% पर्यन्त तुम्ही बँकेकडून आर्थिक कर्ज घेऊ शकता. ठराविक कालावधीसाठी या कर्जाचे मासिक हफ्ते फेडून तुम्हाला तुमचे सोने पुनः बँकेकडून सोडवून घ्यावे लागते. सोने कर्ज म्हणजेच गोल्ड लोन वापरण्यासाठी तुम्हाला कसलीही बंदी नाही. हे कर्ज तुम्ही लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा कसल्याही आर्थिक अडचणीसाठी वापरू शकता.
सोने तारण कर्ज प्रक्रिया? | Gold Loan Procedure in Marathi
सोने तारण कर्जाची प्रक्रिया ही इतर कुठल्याही कर्जापेक्षा अत्यंत सोयीस्कर असते. यामध्ये तुम्ही तुमच्या सोन्याच्या वस्तु आवश्यक कागदपत्रांसह बँकेत जाऊन कर्जाची मागणी करू शकता. बँक सोन्याचे मूल्यांकन करते आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करते. उदा. जर सोन्याचे मूल्यांकन जर १,००,०००/- लाख इतके असेल तर बँक तुम्हाला ७५०००/- रुपये पर्यन्त गोल्ड लोन मंजूर करू शकते. बँक आणि तुमच्यात एक करार ठरवलं जातो जसे की कर्जाची रक्कम, व्याजदर आणि परतफेड करण्याचा कालावधी. हा करार झाला की बँक तुमचे कर्ज लगेचच तुमच्या ठरलेल्या बँक खात्यात जमा करते. ही संपूर्ण प्रक्रिया सध्याच्या काळात खूपच सोप्पी झालेली आहे. अगदी एक ते दोन तासात तुम्हाला हे कर्ज उपलब्ध होऊ शकते.
सोने तारण कर्जाची पात्रता? | Eligibility for Gold Loan in Marathi
सोने तारण कर्जासाठी लागणारी एकमेव पात्रता म्हणजे तुमच्याकडे सोने असणे गरजेचे आहे. जर तुम्ही भारतीय रहिवासी आहात, तुमचे वय १८ पेक्षा अधिक आहे आणि तुमच्याकडे सोने आहे तर तुम्ही भारतात कुठल्याही ठिकाणी सोने कर्ज उपलब्ध करू शकता.
सोने तारण कर्जाचे व्याजदर किती असते ? | Gold Loan interest rates in Marathi
सोने तारण कर्ज हे सुरक्षित कर्ज प्रकारात मोडत असल्या कारणाने कर्जाचे व्याजदर ही अत्यंत माफक असते. कर्जाचे व्याजदर ही बँक ते बँक नुसार बदलू शकते. हे व्याजदर विविध घटकांवर अवलंबून असते यातीलच एक म्हणजे तुम्ही सोन्याच्या बाजार मूल्याच्या किती टक्के कर्ज घेत आहात. जेवढे जास्त टक्के कर्ज तुम्ही घेता तितके व्याजदर देखील वाढू शकते. तसेच तुम्ही घेतलेल्या रकमेचा परतफेड कालावधी किती निवडता यावर देखील व्याजदर कमी जास्त होऊ शकते.
आणखीन महत्वाचे सांगायचे झालेतर सध्या बाजारात अनेक NBFC : Non Banking Financial Company म्हणजेच खाजगी सोने तारण कंपन्या आहेत ज्या तुम्हाला गोल्ड लोन ऑफर करतात. परंतु बँका या NBFC पेक्षा कमी सोने तारण कर्जा वर व्याजदर आकारतात. म्हणून जर तुम्ही सोने कर्ज गेट असाल तर आधी शक्य होईल तितक्या बँका मध्ये कर्ज घेण्याचे पर्याय तुलना करून बघा आणि नंतरच योग्य तिथून कर्ज घ्या.
अश्याच काही ठराविक बँक आणि NBFC संस्थांची व्याजदर खालील प्रमाणे :
बँक | व्याजदर | सोने कर्ज रक्कम |
SBI Gold Loan | ७.००% पासून पुढे | रु. २०००० ते ५० लाख |
HDFC Gold Loan | ११ ते १६% | रु. १०००० पासून अधिक |
Canara Bank Gold Loan | ७.३५% पासून पुढे | रु. ५००० ते ३५ लाख |
Axis Bank Gold Loan | १३ ते १७% | रु. २५००० ते २५ लाख |
Kotak Mahindra Gold Loan | १० ते १७% | रु. २०००० ते १.५ कोटी |
IndusInd Bank Gold Loan | ११.५० ते १६% | रु. १० लाखांपर्यंत |
Bank of Maharashtra Gold Loan | ७.१०% पासून पुढे | रु. २० लाखांपर्यंत |
Muthoot Gold Loan | १२ ते २६% | रु. १५०० पासून पुढे |
Manappuram Gold Loan | २९% पर्यन्त | गरजेनुसार |
PNB Gold Loan | ७.७० ते ८.७५% | रु. २५००० ते रु. १० लाखांपर्यंत |
Bank of Baroda Gold Loan | ९ ते ९.१५% | रु २५ लाखांपर्यं |
सोने तारण कर्जाचा परत फेडीचा कालावधी किती असतो? | Gold Loan tenure in Marathi
सोने तारण कर्जाचा कालावधी हा कर्ज देणाऱ्या बँक किंवा संस्थेवर अवलंबून असतो. साधारणतः ३ महीने ते १२ महीने इतका कालावधी तुम्ही निवडू शकता. जर १२ महिन्यांहून अधिक कालावधी लागणार असेल तर तुम्हाला कर्ज पुनः नूतनीकरण करावे लागते. इतर करजांच्या तुलनेत सोने तारण कर्जाचा कालावधी हा कमी असतो.
सोने तारण कर्ज परतफेड कशी करता येते? | Gold Loan repayment in Marathi
हे कर्ज तुम्ही अनेक पर्यायांसाह परतफेड करू शकता. जसे की सोने तारण कर्जाचे व्याज मासिक, द्वि-मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक भरणे निवडू शकता आणि मुदतीच्या शेवटी कर्जाची मुळ रक्कम पूर्ण भरू शकता. तसेच कर्ज घेतल्यावर संपूर्ण व्याज भरून ठरलेला कालावधी नंतर मुळ रक्कम परत करू शकता. किंवा इतर कर्जाप्रमानेच व्याज आणि मुद्दल दोन्हींचा समावेश करून नियमित EMI मध्ये देखील परतफेड करू शकता.
सोने तारण कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Gold Loan documents in Marathi :
- ओळखीचा पुरावा
- रहिवासी पुरावा
- एक पासपोर्ट फोटो
सर्व साधारण सोने कर्जासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. तसेच महत्वाचे म्हणजे सोने खरेदी पावतीची देखील आवश्यकता नसते.
सोने तारण कर्जा विषयी महत्वाचे | Important Before taking Gold Loan :
सोने तारण कर्ज हे सोयीस्कर जरी असले तरी यामध्ये वेळोवेळी करारानुसार तुमची देय रक्कम ही बँकेत किंवा कर्ज संस्थेत देणे बंधनकारक असते. जर तुम्ही असे नाही केले तर बँक किंवा संस्था तुमच्या तारण ठेवलेल्या सोन्याच्या बदल्यात कर्ज वसूली करू शकते. यामुळे योग्य तितकेच आणि ठरलेल्या वेळेत जर तुम्ही कर्ज परतफेड करू शकत असाल तरच सोने तारण कर्ज घ्यावे अन्यथा तुम्ही तुमचे सोने गमाऊ शकता.
FAQ :
-
सोने तारण कर्ज घेण्यासाठी पात्रता काय असते?
सोने तारण कर्जासाठी लागणारी एकमेव पात्रता म्हणजे तुमच्याकडे सोने असणे गरजेचे आहे. जर तुम्ही भारतीय रहिवासी आहात, तुमचे वय १८ पेक्षा अधिक आहे आणि तुमच्याकडे सोने आहे तर तुम्ही भारतात कुठल्याही ठिकाणी सोने कर्ज उपलब्ध करू शकता.
-
सोने तारण कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, एक पासपोर्ट फोटो. सर्व साधारण सोने कर्जासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. तसेच महत्वाचे म्हणजे सोने खरेदी पावतीची देखील आवश्यकता नसते.
-
सोने तारण कर्जाचा परत फेडीचा कालावधी किती असतो?
सोने तारण कर्जाचा कालावधी हा कर्ज देणाऱ्या बँक किंवा संस्थेवर अवलंबून असतो. साधारणतः ३ महीने ते १२ महीने इतका कालावधी तुम्ही निवडू शकता.
-
सोने तारण कर्ज परतफेड कशी करता येते?
हे कर्ज तुम्ही अनेक पर्यायांसाह परतफेड करू शकता. जसे की सोने तारण कर्जाचे व्याज मासिक, द्वि-मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक भरणे निवडू शकता आणि मुदतीच्या शेवटी कर्जाची मुळ रक्कम पूर्ण भरू शकता.
तसेच कर्ज घेतल्यावर संपूर्ण व्याज भरून ठरलेला कालावधी नंतर मुळ रक्कम परत करू शकता.
किंवा इतर कर्जाप्रमानेच व्याज आणि मुद्दल दोन्हींचा समावेश करून नियमित EMI मध्ये देखील परतफेड करू शकता.
या लोन बद्दल वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारचा कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.
वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
धन्यवाद!
आमच्या इतर महत्वाच्या पोस्ट :
- PM मुद्रा लोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
- Navi App Loan कसे काढावे?
- Money Tap App द्वारे कर्ज कसे काढावे?
- शैक्षणिक कर्ज कसे काढावे?
- पर्सनल ओवरड्राफ्ट लोन म्हणजे काय?
- Home Loan बद्दल सविस्तर माहिती
मी बँकेमध्ये गेलो असता मला सात लाख गोल्ड लोन वर कर्ज पाहिजेत होते माझ्याकडे तेवढे गोल्ड सुद्धा होते मला फक्त पाच लाख रुपये रकमेपेक्षा जास्त गोड लोन एका खात्यावर होत नाही असे सांगण्यात आले