सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती | Gold Loan Quick information in Marathi

सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती Gold loan information Marathi

सोने तारण कर्ज घेण्यासाठी पात्रता, कागदपत्रे, सोने तारण कर्ज कसे घ्यावे?

नमस्कार मित्रांनो, भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक असणाऱ्या देशांपैकी एक मानल्या जातो. भारतात दरवर्षी सोने खरेदी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजेच भारतात सोन्याच्या दागिन्यांना असणारे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व.

सांस्कृतिक म्हणजेच सोन्याचे दागिने परिधान करण्यात भारतीय स्त्रियांचे स्त्रीधन म्हणून मानले जाणे. तसेच आर्थिक म्हणजेच सोन्याचे दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तु आर्थिक गुंतवणूक म्हणून वापरले जाणे.

सोन्याचे दागिने किंवा वस्तु ही सर्व सामान्य माणसांकडे असलेली एक आर्थिक गुंतवणूकच म्हणत येईल. कारण म्हणजे याच आर्थिक गुंतवणुकीचा आर्थिक अडचणीत अत्यंत सोप्या पद्धतीने वापरता येणे. अनेक जन अडचणीच्या काळात सोन्याचा वापर पैसा मिळवण्यासाठी अगदी सहज करतात.

आधीच्या काळात सोने विकून आर्थिक गरज भागवणे ही जुनी पद्धत अस्तित्वात होती परंतु हल्लीच्या काळात याच सोन्यावर कर्ज घेणे हा एक पर्याय आता सर्वांसाठी उपलब्ध झालेला आहे.

आज याच “सोने तारण कर्ज” म्हणजेच “गोल्ड लोन” बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात.

सोने तारण कर्ज म्हणजेच गोल्ड लोन म्हणजे काय ? | What is Gold Loan in Marathi?

सोने कर्ज म्हणजेच सोने तारण ठेवून त्याबदल्यात कर्ज म्हणून ठराविक रक्कम घेणे आणि तीच रक्कम आर्थिक अडचण दूर झाल्यावर परतफेड करून आपले सोने पुनः आपल्याकडे जसेच्या तसे परत घेणे. अगदी साधा आणि सरळ मार्गाने हे कर्ज खूपच कमी कालावधीत घेता येत असल्यामुळे हल्ली लोकांमध्ये सोने तारण कर्ज म्हणजेच गोल्ड लोन हे खूपच लोकप्रिय झाले आहे.

सोने तारण कर्ज म्हणजे गोल्ड लोन हे एक सेक्युरड लोन म्हणजेच सुरक्षित कर्ज म्हणून मानले जाते. गोल्ड लोन मध्ये तुमचे सोने ही स्थावर मालमत्ता म्हणून बँकेकडे गहाण ठेवण्यात येते. त्याबदल्यात सोन्याच्या रकमेच्या किमान ७५% पर्यन्त तुम्ही बँकेकडून आर्थिक कर्ज घेऊ शकता. ठराविक कालावधीसाठी या कर्जाचे मासिक हफ्ते फेडून तुम्हाला तुमचे सोने पुनः बँकेकडून सोडवून घ्यावे लागते. सोने कर्ज म्हणजेच गोल्ड लोन वापरण्यासाठी तुम्हाला कसलीही बंदी नाही. हे कर्ज तुम्ही लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा कसल्याही आर्थिक अडचणीसाठी वापरू शकता.

सोने तारण कर्ज प्रक्रिया? | Gold Loan Procedure in Marathi

सोने तारण कर्जाची प्रक्रिया ही इतर कुठल्याही कर्जापेक्षा अत्यंत सोयीस्कर असते. यामध्ये तुम्ही तुमच्या सोन्याच्या वस्तु आवश्यक कागदपत्रांसह बँकेत जाऊन कर्जाची मागणी करू शकता. बँक सोन्याचे मूल्यांकन करते आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करते. उदा. जर सोन्याचे मूल्यांकन जर १,००,०००/- लाख इतके असेल तर बँक तुम्हाला ७५०००/- रुपये पर्यन्त गोल्ड लोन मंजूर करू शकते. बँक आणि तुमच्यात एक करार ठरवलं जातो जसे की कर्जाची रक्कम, व्याजदर आणि परतफेड करण्याचा कालावधी. हा करार झाला की बँक तुमचे कर्ज लगेचच तुमच्या ठरलेल्या बँक खात्यात जमा करते. ही संपूर्ण प्रक्रिया सध्याच्या काळात खूपच सोप्पी झालेली आहे. अगदी एक ते दोन तासात तुम्हाला हे कर्ज उपलब्ध होऊ शकते.

सोने तारण कर्जाची पात्रता? | Eligibility for Gold Loan in Marathi

सोने तारण कर्जासाठी लागणारी एकमेव पात्रता म्हणजे तुमच्याकडे सोने असणे गरजेचे आहे. जर तुम्ही भारतीय रहिवासी आहात, तुमचे वय १८ पेक्षा अधिक आहे आणि तुमच्याकडे सोने आहे तर तुम्ही भारतात कुठल्याही ठिकाणी सोने कर्ज उपलब्ध करू शकता.

सोने तारण कर्जाचे व्याजदर किती असते ? | Gold Loan interest rates in Marathi

सोने तारण कर्ज हे सुरक्षित कर्ज प्रकारात मोडत असल्या कारणाने कर्जाचे व्याजदर ही अत्यंत माफक असते. कर्जाचे व्याजदर ही बँक ते बँक नुसार बदलू शकते. हे व्याजदर विविध घटकांवर अवलंबून असते यातीलच एक म्हणजे तुम्ही सोन्याच्या बाजार मूल्याच्या किती टक्के कर्ज घेत आहात. जेवढे जास्त टक्के कर्ज तुम्ही घेता तितके व्याजदर देखील वाढू शकते. तसेच तुम्ही घेतलेल्या रकमेचा परतफेड कालावधी किती निवडता यावर देखील व्याजदर कमी जास्त होऊ शकते.

आणखीन महत्वाचे सांगायचे झालेतर सध्या बाजारात अनेक NBFC : Non Banking Financial Company म्हणजेच खाजगी सोने तारण कंपन्या आहेत ज्या तुम्हाला गोल्ड लोन ऑफर करतात. परंतु बँका या NBFC पेक्षा कमी सोने तारण कर्जा वर व्याजदर आकारतात. म्हणून जर तुम्ही सोने कर्ज गेट असाल तर आधी शक्य होईल तितक्या बँका मध्ये कर्ज घेण्याचे पर्याय तुलना करून बघा आणि नंतरच योग्य तिथून कर्ज घ्या.

अश्याच काही ठराविक बँक आणि NBFC संस्थांची व्याजदर खालील प्रमाणे :

बँकव्याजदरसोने कर्ज रक्कम
SBI Gold Loan७.००% पासून पुढेरु. २०००० ते ५० लाख
HDFC Gold Loan११ ते १६%रु. १०००० पासून अधिक
Canara Bank Gold Loan७.३५% पासून पुढेरु. ५००० ते ३५ लाख
Axis Bank Gold Loan१३ ते १७%रु. २५००० ते २५ लाख
Kotak Mahindra Gold Loan१० ते १७%रु. २०००० ते १.५ कोटी
IndusInd Bank Gold Loan११.५० ते १६%रु. १० लाखांपर्यंत
Bank of Maharashtra Gold Loan७.१०% पासून पुढेरु. २० लाखांपर्यंत
Muthoot Gold Loan१२ ते २६%रु. १५०० पासून पुढे
Manappuram Gold Loan२९% पर्यन्तगरजेनुसार
PNB Gold Loan७.७० ते ८.७५%रु. २५००० ते रु. १० लाखांपर्यंत
Bank of Baroda Gold Loan९ ते ९.१५%रु २५ लाखांपर्यं
सोने तारण कर्ज व्याजदर

सोने तारण कर्जाचा परत फेडीचा कालावधी किती असतो? | Gold Loan tenure in Marathi

सोने तारण कर्जाचा कालावधी हा कर्ज देणाऱ्या बँक किंवा संस्थेवर अवलंबून असतो. साधारणतः ३ महीने ते १२ महीने इतका कालावधी तुम्ही निवडू शकता. जर १२ महिन्यांहून अधिक कालावधी लागणार असेल तर तुम्हाला कर्ज पुनः नूतनीकरण करावे लागते. इतर करजांच्या तुलनेत सोने तारण कर्जाचा कालावधी हा कमी असतो.

सोने तारण कर्ज परतफेड कशी करता येते? | Gold Loan repayment in Marathi

हे कर्ज तुम्ही अनेक पर्यायांसाह परतफेड करू शकता. जसे की सोने तारण कर्जाचे व्याज मासिक, द्वि-मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक भरणे निवडू शकता आणि मुदतीच्या शेवटी कर्जाची मुळ रक्कम पूर्ण भरू शकता. तसेच कर्ज घेतल्यावर संपूर्ण व्याज भरून ठरलेला कालावधी नंतर मुळ रक्कम परत करू शकता. किंवा इतर कर्जाप्रमानेच व्याज आणि मुद्दल दोन्हींचा समावेश करून नियमित EMI मध्ये देखील परतफेड करू शकता.

सोने तारण कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Gold Loan documents in Marathi :

  • ओळखीचा पुरावा
  • रहिवासी पुरावा
  • एक पासपोर्ट फोटो

सर्व साधारण सोने कर्जासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. तसेच महत्वाचे म्हणजे सोने खरेदी पावतीची देखील आवश्यकता नसते.

सोने तारण कर्जा विषयी महत्वाचे | Important Before taking Gold Loan :

सोने तारण कर्ज हे सोयीस्कर जरी असले तरी यामध्ये वेळोवेळी करारानुसार तुमची देय रक्कम ही बँकेत किंवा कर्ज संस्थेत देणे बंधनकारक असते. जर तुम्ही असे नाही केले तर बँक किंवा संस्था तुमच्या तारण ठेवलेल्या सोन्याच्या बदल्यात कर्ज वसूली करू शकते. यामुळे योग्य तितकेच आणि ठरलेल्या वेळेत जर तुम्ही कर्ज परतफेड करू शकत असाल तरच सोने तारण कर्ज घ्यावे अन्यथा तुम्ही तुमचे सोने गमाऊ शकता.

FAQ :

  1. सोने तारण कर्ज घेण्यासाठी पात्रता काय असते?

    सोने तारण कर्जासाठी लागणारी एकमेव पात्रता म्हणजे तुमच्याकडे सोने असणे गरजेचे आहे. जर तुम्ही भारतीय रहिवासी आहात, तुमचे वय १८ पेक्षा अधिक आहे आणि तुमच्याकडे सोने आहे तर तुम्ही भारतात कुठल्याही ठिकाणी सोने कर्ज उपलब्ध करू शकता.

  2. सोने तारण कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

    ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, एक पासपोर्ट फोटो. सर्व साधारण सोने कर्जासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. तसेच महत्वाचे म्हणजे सोने खरेदी पावतीची देखील आवश्यकता नसते.

  3. सोने तारण कर्जाचा परत फेडीचा कालावधी किती असतो?

    सोने तारण कर्जाचा कालावधी हा कर्ज देणाऱ्या बँक किंवा संस्थेवर अवलंबून असतो. साधारणतः ३ महीने ते १२ महीने इतका कालावधी तुम्ही निवडू शकता.

  4. सोने तारण कर्ज परतफेड कशी करता येते?

    हे कर्ज तुम्ही अनेक पर्यायांसाह परतफेड करू शकता. जसे की सोने तारण कर्जाचे व्याज मासिक, द्वि-मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक भरणे निवडू शकता आणि मुदतीच्या शेवटी कर्जाची मुळ रक्कम पूर्ण भरू शकता.
    तसेच कर्ज घेतल्यावर संपूर्ण व्याज भरून ठरलेला कालावधी नंतर मुळ रक्कम परत करू शकता.
    किंवा इतर कर्जाप्रमानेच व्याज आणि मुद्दल दोन्हींचा समावेश करून नियमित EMI मध्ये देखील परतफेड करू शकता.

या लोन बद्दल वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारचा कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.

वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

धन्यवाद!

आमच्या इतर महत्वाच्या पोस्ट :

कार लोन माहिती मराठी | Quick Car Loan Information in Marathi

Car Loan Information in Marathi | कार लोन माहिती मराठी

Car Loan म्हणजे काय? Car Loan कसे घ्यावे? Car Loan व्याजदर किती असतात?  Car loan कागदपत्र? Car Loan पात्रता? वाहन कर्ज योजना, Car Loan in Marathi

Car Loan Information in Marathi | कार लोन माहिती मराठी :

नमस्कार मित्रांनो, सध्याच्या काळात कार घेण्याची इच्छा सर्व साधारण व्यक्तीला असतेच. कार असणे ही सर्वसाधारण घरातली एक गरज देखील झाली आहे. स्वतःच्या फॅमिली सोबत वीकेंड ट्रीप असो किंवा सुट्टीमध्ये गावी फिरायला जाणे असो कार ही हवीच. अनेकदा महत्वाच्या कामासाठी अचानक जाणे असलेतरी कार खूपच गरजेची वाटते.

कार असण्याचे फायदे जर बघितलेतर सर्व साधारण व्यक्तिगत आयुष्यात कारचे अनमोल स्थान असते. कार ही एक फॅमिली मेंबर बनवण्याची जणू काही आता प्रथाच झालेली आहे. यासाठीच आजचा विषय आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

आज आपण बघणार आहोत कार लोन विषयी महत्वाची माहिती. कार लोन घेणे अत्यंत सोपे आणि सोयीस्कर जरी असले तरी काही महत्वाच्या बाबी आपल्याला आधी लक्षात ठेवावेच लागतील. चला तर जाणून घेऊयात सर्व माहिती.

कार लोन म्हणजे काय? | What is a Car Loan?

सध्याच्या काळात वाहन कर्ज ही बँक सुविधा सर्व सामान्य लोकांना महत्वाची झालेली आहे. वाहन कर्जा मध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तसेच टेम्पो, ट्रक आणि बस सारख्या खाजगी तसेच कमर्शियल वाहनांसाठी कर्जाची सुविधा बँकेतून घेऊ शकतो. चारचाकी वाहन घेण्यासाठी बँकेतून घेतलेले कर्ज म्हणजेच कार लोन किंवा ४ व्हीलर लोन आपण म्हणू शकतो. कार लोन हे नवीन किंवा जुन्या कार साठी घेता येऊ शकते. जाणून घेऊयात नवीन आणि जुन्या कार लोन बद्दल फरक.

वैशिष्ट्यनवीन कार कर्जवापरलेले कार कर्जफरक  
कालावधीआठ वर्षांपर्यंतचा ईएमआयसात वर्षांपर्यंतचा ईएमआयनवीन कार लोन अधिक काळासाठी घेता येत असल्या कारणाने ईएमआय ची रक्कम बजेट नुसार ठेवता येते.
डाउन पेमेंटशून्य डाउन पेमेंटचा पर्याय आपण घेऊ शकतोकिमान 10 टक्के ऑन-रोड किमतीच्या डाउन पेमेंट करावे लागतेएकाच बजेटसाठी, वापरलेल्या कारचे कर्ज निवडताना तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागतील  
व्याज दर९ ते १३%१० ते १६%जास्त व्याजदर आणि कमी कालावधी आणि उच्च डाउन पेमेंटसह, तुम्हाला तुमचे मासिक खर्च कमी ठेवायचे असल्यास नवीन कार कर्ज अधिक फायद्याचे आहे.
कारनवीन कार काही विशिष्ट बजेट पर्यन्त मर्यादित असतेनवीन कारच्या बजेट मध्ये उच्च श्रेणीतील जुनी कार खरेदी करू शकताप्रत्येक कारची किंमत दिवसेंदिवस कमी होत असल्याने, जर तुम्हाला कमी बजेटमध्ये मोठ्या आलिशान कारमध्ये अपग्रेड करायचे असेल तर वापरलेली कार एक चांगली डील असू शकते.  
Car Loan Types

कार लोन चे प्रकार? | Types of Car Loan

कार लोनमुळे आपली ड्रीम कार खरेदी करणे, मग ती गरजेची असो किंवा विश्रांतीसाठी, अगदी सोपे होऊ शकते. एकदम मोठ्या रकमेचा भरणा करण्याऐवजी कार लोन तुम्हाला हवी असलेली कार ताबडतोब मिळविण्यात आणि सुलभ हप्त्यांमध्ये पैसे देण्यास मदत करू शकते. तुम्ही कोणत्या प्रकारची कार लोन घेऊ शकता ते पाहू या:

1. नवीन कार लोन – ही फॅक्टरी फ्लोअरपासून नवीन ब्रँड डीलरशिपवर येणाऱ्या, अगदी नवीन कारवर ऑफर केलेली कर्जे आहेत. नवीन कार मालकाला अधिक चांगली सेवा, सुटे भाग आणि ब्रँड-बॅक्ड वॉरंटी सहज उपलब्ध होतील. 

2. वापरलेली कार लोन – हे डीलर किंवा व्यक्तींकडून वापरलेल्या कारवर दिलेली कर्जे आहेत. वापरलेल्या कारची किंमत सामान्यत: नवीन असतानाच्या तुलनेत खूपच कमी असते, बहुतेकदा त्याच किमतीच्या नवीन कारपेक्षा अधिक प्रीमियम कार आपण यामुळे घेऊ शकतो.

3. कार विरुद्ध लोन – याला पुनर्वित्त सुद्धा म्हणतात, हे लोन कमी व्याजदराने आपली कार बँकेकडे गहाण ठेवून नवीन कर्ज घेऊन किंवा परतफेडीचा कालावधी वाढवून तुमची इतर देणे कमी करण्यात मदत करू शकतात.

कार लोन घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे | Documents required for a Car Loan

  • ओळखीचा पुरावा
  • रहिवासी पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • गाडीचे कागद पत्रे
  • मागील ३ महिन्याचे सॅंलरी स्लिप
  • मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • व्यावसायिक असालतर आयकर भरलेली पावती

कार लोन कसे घ्यावे? | How to Apply for Car Loan

नवीन कार लोन आणि जुन्या कार लोन प्रक्रिया दोन्ही वेगळ्या असतात. नवीन कारसाठी कारच्या शोरूम मध्येच बँकेचे प्रतिनिधि नेमलेले असतात. कारची निवड केल्या नंतर तुम्हाला फक्त कार लोनचा फॉर्म तुमच्या संपूर्ण माहिती सह आणि तुमच्या कागद पत्रांसाह सबमिट करावा लागतो. कर्जाचा ईएमआय हा साधारणतः तुम्ही किती डाऊन पेमेंट करता यावर अवलंबून असते.

जुन्या कारसाठी तुम्हाला स्वतः बँकेत जाऊन कार लोनसाठी अर्ज करावा लागतो. बाकी संपूर्ण प्रक्रिया ही शक्यतो सारखीच असते. महत्वाच म्हणजे नवीन कार साठीचे कर्ज आणि जुन्या कार साठीचे कर्ज याचे व्याजदरात बराच फरक असतो. जुन्या कार साठी कर्जाचे व्याजदर हे नवीन कार साठी घेतलेल्या कर्जाच्या अधिक असते.

कार लोनसाठी व्याजदर | Interest rates for Car Loans

नवीन कार साठी साधारणतः ९ ते १३% आणि जुन्या कार साठी १० ते १६% इ. असू शकते. काही बँका  महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच सरकारी कर्मचारी आणि कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना  कार लोनसाठी व्याजदरात सूट देखील देते. जुन्या कार चे कर्जाचे व्याजदर अधिक असल्या कारणाने कधीही नवीन कार घेणे हा उत्तम पर्याय असू शकतो.

काही ठराविक बँक आणि त्यांचे व्याजदर :

बँकेचे नावव्याजदर
SBI७.२०% पासून पुढे
HDFC७.९५% पासून पुढे
ICICI७.८५% पासून पुढे
IDBI७.३५% पासून पुढे
Union Bank७.४०% पासून पुढे
Kotak Mahindra Bank६.५०% पासून पुढे
Tata Capital Finance७.००% पासून पुढे
Car Loan provider Bank and Interest Rate

कार लोनसाठी पात्रता | Eligibility for Car Loan

  • कार लोन ऑफर करण्यापूर्वी बँका आणि फायनान्सर विविध गोष्टी पाहतात, यामध्ये पुढील काही गोष्टी समाविष्ट आहे:
  • अर्जदाराचे वय, किमान आणि कमाल उत्पन्न मर्यादा
  • स्थिर रोजगार किंवा व्यवसायाच्या पुरावा आणि मासिक उत्पन्न
  • तुमचा क्रेडिट स्कोअर
  • विशिष्ट बँक/फायनान्सरशी तुमचे पूर्वीचे संबंध
  • कारचा प्रकार – वापरलेले किंवा नवीन
  • निवासस्थानाची स्थिरता
  • जुन्या कारच्या अधिक हस्तांतरणामुळे जास्त व्याजदर किंवा कर्जाची रक्कम कमी होऊ शकते

कार लोन घेण्या आधी लक्षात ठेवा | Important Things you must know before taking Car Loan

  • कार लोनसाठी EMI वीचारात घेतल्यानंतर तुम्ही दरमहा तुमच्या इतर खर्चाची रक्कम शिल्लक राहील याची खात्री करा.
  •  तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीनुसार कार घेण्यासाठीच सर्वोत्तम कालावधी निवडली असल्याची खात्री करा
  •  आर्थिक आणीबाणी उद्भवल्यास, EMI न भरल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आणि भविष्यात नवीन कर्जासाठी अर्ज करताना अडचण निर्माण होऊ शकते, यासाठी EMI वेळेवर भरू शकता याची खात्री करा.

हाइपोथेकेशन म्हणजे काय? | What is hypothecation?

हायपोथेकेशन ही कर्जाच्या बदल्यात मालमत्ता ठराविक कालावधी साठी म्हणून वापरण्यास सहमती देण्याची प्रक्रिया आहे. कार कर्जासह तुम्ही सहमत आहात की तुमची कार तुमचे कर्ज सुरक्षित करण्यासाठी अप्रत्यक्ष म्हणून वापरली जाते. तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसल्यास, तुमची बँक कार परत घेऊ शकते. हायपोथेकेशन प्रत्येक प्रकारच्या कर्जामध्ये नसते.

FAQ

  1. कार लोन साठी क्रेडिट स्कोर किती असावा?

    प्रत्तेक बँक लोनसाठी क्रेडिट स्कोर किमान ७५० पेक्षा अधिक असेलतर उत्तम ग्राह्य धरते परंतु काही कारणास्तव जर स्कोर कमी असेलतर तुम्हाला व्याजदरात तडजोड करण्याचे पर्याय दिले जातात.

  2. कार लोन परतफेड करण्याचा कालावधी किती असतो?

    कार लोन परतफेड करण्याचा कालावधी किमान १२ महीने ते ७ वर्षे इतका असू शकतो परंतु सध्या काही बँक ८ वर्षे इतकाही कालावधी उपलब्ध करून देत आहेत.

  3. कार लोन घेण्यासाठी सर्वोत्तम बँक कोणती?

    सर्वच राष्ट्रीयकृत बँका लोन घेण्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो, तसेच काही प्रायवेट फायनॅन्स कंपनी देखील चांगले कार लोन उपलब्ध करून देतात.

  4. कार घेण्याचा उत्तम कालावधी कोणता?

    कार उत्पादक कार नेहमी वर्ष संपण्याच्या आत कार विकण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्या वर्षी कार उत्पादन वर्ष बदलल्या नंतर कारची किंमत कमी होत असल्या कारणाने प्रतेक वर्ष संपण्याच्या शेवटी शेवटी कार कंपनी कार किमतीवर भरघोस सवलत देत असते. यामुळेच दसरा दिवाळी सणामध्ये भरघोस सूट दिली जाते. नवीन कार घेण्याचा हा एक उत्तम कालावधी असू शकतो. यापेक्षाही अधिक सवलत डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला बघायला मिळू शकतो.

  5. कार लोन सुरू असताना कार विकता येते का?

    नाही, कार लोन सुरू असताना कार ही लोन असलेल्या बँकेच्या मालकीची मानली जाते. कार विकण्या आधी कार लोन संपूर्ण भरून बँक NOC घेऊन RTO ऑफिस मधून HP म्हणजेच हयपोथीकटीओण उतरवून तुमचा मालकी हक्क कारच्या कागदपत्रांवर नमूद करावा लागतो. तरच तुम्ही कार विकू शकता.

या लोन बद्दल वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारचा कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.

वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

धन्यवाद!

आमच्या इतर महत्वाच्या पोस्ट :

Home Loan Information in Marathi | होम लोन माहिती मराठी: होम लोन पात्रता, कागदपत्रे, Quick कर्ज कसे मिळवावे.

Home Loan information in Marathi

Home Loan Information in Marathi:

नमस्कार मित्रांनो, स्वतःचे हक्काचे घर असावे ही आपण सर्वांचीच इच्छा असते. परंतु घर घ्यायच असेलतर सर्वात प्रथम विचार येतो तो म्हणजे गृह कर्जाचा म्हणजेच Home Loan चा. होम लोन बोलताना जितक साध सरळ वाटत तितकाच ते घेताना बऱ्याच अडचणींचा सामना देखील करावा लागतो. यामागाचे महत्वाचे कारण म्हणजे आपण एकतर लोन बद्दल सविस्तर माहिती घेतलेली नसते आणि बँक मध्ये अर्ज करण्यापासून कर्ज मिळे पर्यंतच्या सर्व गोष्टी आपल्याला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालेल्या असतात.

यासाठीच हा महत्वाचा लेख संपूर्ण वाचा. या लेखात आपल्याला होम लोन चे किती प्रकार असतात असतात? होम लोन कसे काढावे? होम लोन चे फायदे? होम लोन साठीचे कागदपत्र? अश्या संपूर्ण महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

होम लोन म्हणजे काय? (Home Loan Meaning in Marathi)

स्वतःच्या मालकीच घर घेण्यासाठी किंवा बांधकामासाठी बँके मार्फत दिले जाणारे कर्ज ही गृह कर्ज म्हणजेच होम लोन या विभागात मोडते. होम लोन किंवा गृह कर्ज ज्याला आपण म्हणतो ही साधारणतः फक्त घर घेण्यासाठीचे कर्ज आपण मानतो. होम लोन ही नवीन घर घेण्यासाठीचे असून इतरही अनेक प्रकारे आपण होम लोन घेऊ शकतो. जसे की जमीन खरेदी, जमिनीवर घर बांधकाम करण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी आणि घराची डागडुजी तसेच पुनर्बांधणी करण्यासाठी.  

होम लोनचे प्रकार? (Types Of Home Loans in Marathi)

  • घर खरेदीसाठी कर्ज : रेडिमेड घर किंवा फ्लॅट घेण्यासाठीचे हे कर्ज असते.
  • जमीन खरेदीसाठी कर्ज : घर बांधण्यासाठी जमीन घेण्यास हे कर्ज दिले जाते. या कर्जासाठी अट म्हणजे घर बांधण्यासाठी घेणारी जमीन ही नॉन अग्रि झोन मधील असावी.
  • घरबांधकाम कर्ज : हे कर्ज तुमच्या हककाच्या जागेत तुम्हाला घर बांधकामासाठी दिले जाते.
  • घर सुधारणेसाठी कर्ज : हे कर्ज घराला डागडुजी करणे, घरात सुधारणा करणे तसेच अंतर्गत इतर सुधारणा करण्यासाठी दिले जाते.
  • घराचा विस्तार करण्यासाठी कर्ज : हे कर्ज तुम्ही राहत असलेल्या घरात अजून खोली किंवा मजला बांधण्यासाठी दिले जाते.   
  • बॅलेन्स ट्रान्सफर होम लोन : हे लोन तुम्ही सध्या चालू असलेल्या बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करत असाल तर याला बॅलेन्स ट्रान्सफर म्हणले जाते. यामध्ये तुमचे चालू लोन उर्वरित रकमेवर ही दुसरी बँक कमी व्याजदराणे स्वतःकडे घेते.  
  • स्टॅम्प ड्यूटी कर्ज : घर किंवा जमीन खरेदी करताना देण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी ही कर्ज दिले जाते.
  • कंपोसीट होम लोन : हे कर्ज घर बांधण्यासाठी लागणारी जमीन आणि घरबांधकाम यासाठी एकत्र कर्ज बँकेतून आपण घेऊ शकतो.

होम लोनचे फायदे (Home Loan Benefits In Marathi)

  • होम लोन सर्वसाधारणतः प्रतेक व्यक्तीला हमखास मिळू शकते कारण यामध्ये घेतलेले घर, जमीन किंवा इतर स्थावर मालमत्ता बँक स्वतःकडे कर्जाच्या कालावधी पर्यन्त गहाण म्हणून ठेवते. हे कर्ज सुरक्षित कर्ज प्रकारामध्ये म्हणजेच Secured Loan मानले जाते.
  • हे कर्ज सुरक्षित असल्या कारणाने यावर व्याजदरही कमी असतो.
  • महिलांसाठी खास व्याजदर सवलत आपण मिळवू शकता.
  • PM आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात १,३०,००० तसेच शहरी भागात १,२०,००० पर्यन्त सवलत मिळू शकते    
  • RBI द्वारे व्याजदरात कपात झाल्यावर आपण कर्जाचे व्याजदर चालू व्याजदराप्रमाणे बदलून घेऊ शकतो. ज्यामुळे व्याजदर कमी झाल्यावर आपल्याला अतिरिक्त फायदा भेटू शकतो.
  • कर्ज परतफेडीसाठी मिळणारा कालावधी हा इतर कोणत्याही कर्जाच्या तुलनेत अधिक असतो.
  • सोयीस्कर कर्ज फेडीसाठी तुम्ही अतिरिक्त रक्कम भरून कर्जाची रक्कम लवकर परतफेड करू शकता.
  • होम लोनमुळे इन्कम टॅक्स मध्ये सवलत घेऊ शकतो.

होम लोनसाठी महत्वाची कागदपत्रे (Documents Required For Home Loan in Marathi)

सर्व बँक साधारणतः एक सारखेच कागदपत्र होम लोन साठी मागतात परंतु काही ठराविक बँकामध्ये अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते. खाली सर्वसाधारण कागदपत्रांची यादी आहे. जर आपण कर्ज घेणार असाल तर आपल्या बँकेत दिल्या जाणाऱ्या कागदपत्रांची चौकशी करून घेणे.

  • बँकेचा अर्ज तुमच्या संपूर्ण महितीसाहित
  • पासपोर्ट फोटो
  • KYC डॉक्युमेंट (ओळखीचा आणि रहिवासी पुरावा)
  • ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • कर्ज प्रक्रिया शुल्क चेक
  • घराचे / जागेचे कागदपत्र
  • नोकरी करणाऱ्याना ६ सॅलरी स्लिप
  • व्यवसाय करणाऱ्याना इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटमेंट ३ वर्षांपर्यंतचे
  • घर बांधकाम करणार असेलतर घराचा आराखडा

होम लोन साठी आवश्यक पात्रता (Eligibility for Home Loan in Marathi)

होम लोनसाठी पात्रता बँक ते बँक वेगळी असू शकते. कर्जाची पात्रता कर्जाच्या प्रकारानुसार तसेच अर्जदाराच्या उत्पन्न प्रकार, स्थावर मालमत्ता आणि विकत किंवा बांधकाम करणाऱ्या घराच्या एकूण किमतीवर अवलंबून असू शकते.   सर्वसाधारण पात्रता पुढीलप्रमाणे :

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदाराचे वय २१ ते ७० असावे. (वयाची अट गृह कर्जाच्या आणि उत्पन्नाच्या प्रकारानुसार बदलू शकते.)
  • अर्जदाराचा किमान क्रेडिट स्कोर ७५० किंवा त्याहून अधिक असावा.
  • नोकरी करणारा अर्जदार साधारणतः ३ वर्षाहून अधिक नोकरी करणारा असावा.
  • स्वयंरोजगार करणारा अर्जदाराचा व्यवसाय किमान ३ ते ५ वर्षहून अधिक असावा.
  • अर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न २५,००० रुपये असावे.

होम लोन साठी अर्ज कसा करावा? (How to Apply for Home Loan in Marathi)

आपण होम लोन ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन घेऊ शकता. आजच्या काळात सर्वच बँका ऑनलाइन अर्जाद्वारे देखील कर्ज प्रक्रिया पूर्ण करतात. जर आपल्याला ऑनलाइन प्रक्रिया जमत नसेलतर प्रत्यक्ष बँकेत जाऊन अर्ज करू शकता.

  • अर्ज करताना संपूर्ण महितीसह आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे बँक आपल्याकडून जमा करून घेते.
  • सर्व कागदपत्रे पडताळणी करून अर्जदार पात्र असेलतर बँक तुम्हाला दिली जाणारी कर्जाची रक्कम आणि व्याजदर ठरवते.
  • बँकेमार्फत कर्जाचे अगरीमेन्ट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्ज मिळते.

कर्ज देणाऱ्या बँका :

१. SBI Home Loans

२. ICICI Home Finance

३. HDFC Housing Finance

४. Kotak Mahindra Home Loan

५. Tata Capital Home Loan

अश्याच इतरही अनेक बँका आहेत ज्या गृह कर्ज देऊ करतात.

या लोन बद्दल वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारचा कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.

वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

धन्यवाद!

FAQ:

  1. गृह कर्ज वयोमर्यादा काय आहे?

    गृह कर्ज घेण्यासाठी अर्जदार २१ ते ७० वयोगटातला असावा. वय मर्यादा कर्जाच्या आणि उत्पन्नाच्या प्रकारानुसार बँक ते बँक बदलू शकते.

  2. गृह कर्ज परतफेड कालावधी किती असतो?

    कर्जाचा कालावधी साधारणतः ५ वर्षे ते ३० वर्षे असतो.

  3. बँक किती गृह कर्ज देऊ शकते?

    बँकाकडून किमान ८० टक्के गृह कर्ज दिल्या जाऊ शकते.

  4. गृह कर्जा मध्ये किती सह कर्जदार असू शकतात?

    मुख्य अर्जदारासह अर्जदाराचे इतर नातेवाईक मिळून ७ लोक गृह कर्जा मध्ये सह कर्जदार बनू शकतात.

आमच्या इतर महत्वाच्या पोस्ट :

शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे संपूर्ण माहिती मराठीत | Get a Quick Educational Loan Information in Marathi

शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे? Educational Loan information in Marathi

शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे संपूर्ण माहिती मराठीत | Get a Quick Educational Loan Information in Marathi:

नमस्कार मित्रांनो, आजच्या महागाईच्या वाढत्या काळात चांगले शिक्षण घेणे अत्यंत कठीण झाले आहे. सर्व सामान्य विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेणे कठीण झाले. याचे कारण म्हणजे शिक्षण संस्थांची फी आवाक्याबाहेर असणे. अश्या परिस्थितिमध्ये शैक्षणिक कर्ज म्हणजेच Educational Loan घेणे हाच एक सोयीचा पर्याय आहे.

शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे? (How to get Educational Loan?), शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असतात? (Documents required for Educational Loan?), शैक्षणिक कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण बघणार आहोत.

शैक्षणिक कर्ज ही ज्या विद्यार्थ्याना पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण भारतात किंवा परडदेशत घ्यायचे आहे परंतु त्यांची आर्थिक परिस्थिति ठीक नाही आशावेळेस बँक विद्यार्थ्याना शैक्षणिक कर्ज देऊ करते. शैक्षणिक कर्ज ही शिक्षण घेण्यासाठी भेटते आणि शिक्षणाचा कालावधी संपूर्ण झाल्यावर काही ठराविक कालावधी नंतर आपण परतफेड करू शकतो.

SBI ही भारतातील शैक्षणिक कर्ज देणारी एक अग्रगण्य बँक असून विविध प्रकारचे शैक्षणिक कर्ज बँकेमार्फत देण्यात येते. एसबीआय विद्यार्थी ऋण योजना, स्कॉलर ऋण म्हणजेच ज्या विद्यार्थ्याना आयआयटी, आयआयएम, एनआयटी सारख्या उच्च शिक्षणस कर्ज, विदेश शिक्षण कर्ज योजना ७.५० लाखांहून अधिक, स्किल लोन १.५ लाखांपर्यंत, डॉ. आंबेडकर व्याज सबसिडी योजना अश्या अनेक विविध योजना आपण घेऊ शकतो.

इतरही अनेक बँक महाराष्ट्रात आणि भारतात उपलब्ध आहेत जे शैक्षणिक कर्ज विविध योजनांच्या मार्फत उपलब्ध करून देतात. शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पात्रता काय असते आपण बघूयात.

शैक्षणिक कर्जाचे फायदे? Benefits of Educational Loan :

शैक्षणिक कर्ज घेणे अनेकदा बरेचजन अवघड समजतात आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर कर्जाची परतफेड कशी करणार याचा विचार करून शैक्षणिक कर्ज घेणे टाळतात. पण शैक्षणिक कर्जाचे अनेक फायदे देखील आहेत. जसे की,

  • शैक्षणिक कर्ज ही कर्ज नसून भविष्यासाठी केलेली एक प्रकारची गुंतवणूक आपण समजू शकतो.
  • शैक्षणिक कर्ज घेऊन आपण नामांकित विद्यापीठाची पदवी शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो.
  • शैक्षणिक कर्ज घेतल्यावर लगेचच परतावा करण्याची आवश्यकता नसते. शिक्षण पूर्ण झाल्यावर किमान एक वर्ष नंतर आपण कर्जाची परतफेड करू शकतो.
  • शैक्षणिक कर्ज परतफेड करताना दिलेल्या व्याजाची रक्कम नंतर इन्कम टॅक्स मध्ये आपण कमी करून घेऊ शकतो.

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे? Documents for Educational Loan :

  • KYC साठी लागणारी कागदपत्रे
  • बँक स्टेटमेंट / पास बूक ६ महिन्यांचे
  • ग्यारंटर फॉर्म – पर्यायी (Optional)
  • महाविद्यालयाची फी परतफेड करण्याचे वेळापत्रक आणि प्रवेशाची प्रत
  • SSC, HSC, पदवी अभ्यासक्रमांची गुणपत्रिक / उत्तीर्ण प्रमाणपत्रे

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा? How to apply for Educational Loan :

शैक्षणिक कर्ज घेणे अगदी सोपे आणि सोयीस्कर आहे.

  • सर्वप्रथम बँक शाखेत जाऊन कर्जाचा अर्ज पूर्ण भरावा
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत
  • त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल
  • सादर केलेले कागदपत्रे आणि अर्ज संपूर्ण योग्य असेलतर तुमचा अर्ज मंजूर केला जाइल व कर्ज दिले जाइल.

शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी पात्रता? Eligibility for Educational loan :

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा
  • अर्जदाराचे किमान वय १८ ते ३५ च्या दरम्यान असावे
  • अर्जदाराचे शैक्षणिक रेकॉर्ड उत्तम असावा
  • अर्जदार किमान पदवी / पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अर्ज करणार असावा
  • कर्जाच्या रकमेणूसार हमीदार आणि परिवारांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध असावा

शैक्षणिक कर्ज परतफेड कालावधी? Educational Loan EMI Duration :

शैक्षणिक कर्जाची परतफेड साधारणतः शिक्षणाचा कालावधी संपूर्ण झाल्यावर एक वर्षांच्या नंतर पुढील १५ वर्षांपर्यंत व्याजाच्या रकमेणूसार अवलंबून असतो.

शैक्षणिक कर्जाचे व्याजदर? Educational Loan Interest rate :

किमान व्याजदर हे ८.००% प्रती वर्ष किंवा अधिक असू शकते

शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या? Educational Loan Provider Banks :

शैक्षणिक कर्ज ही साधारणतः सर्व राष्ट्रीयकृत बँकेत मिळते. काही महत्वाच्या कर्ज देणाऱ्या बँका खालीलप्रमाणे आहेत. या सर्व बँका मध्ये जाऊन आपण शैक्षणिक कर्जाची चौकशी करू शकता.

  • SBI
  • PNB
  • Axis
  • Bank of Baroda
  • HDFC
  • Kotak Mahindra Bank
  • Federal Bank
  • Union Bank of India
  • Bank of Maharashtra
  • Tata Capital
  • IDFC First Bank
  • Canara Bank

या लोन बद्दल वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारचा कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.

वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

धन्यवाद!

FAQ

  1. शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी कोणती बँक चांगली आहे?

    सर्व राष्ट्रीयकृत बँका शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी सोयीस्कर ठरतात.

  2. शैक्षणिक कर्ज किती मिळू शकते?

    अंदाजे ४ लाखांपासून २५ लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज आपण घेऊ शकता.

  3. शैक्षणिक कर्ज ०% व्याजदरात घेता येतेकां?

    नाही.

  4. शैक्षणिक कर्जासाठी सरकारची कोणती योजना आहे?

    विद्या लक्ष्मी पोर्टल द्वारे आपण सरकारच्या शैक्षणिक कर्ज योजना आपण घेऊ शकतो.

  5. शैक्षणिक कर्ज वयोमार्याद काय आहे?

    किमान १८ वर्ष ते ३५ वर्ष वयोगटातला अर्जदार असावा.

इतर कर्ज माहिती सविस्तर जाणून घ्या :

Navi Loan App Loan in 1 Hour | १ तासांच्या आत Quick Personal Loan
Money Tap अँप द्वारे लोन कसे काढावे.
शेती कर्जविषयी माहिती जाणून घ्या.
PM मुद्रा लोन विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
पर्सनल Overdraft लोन म्हणजे काय?

Navi Loan App Loan in 1 Hour | १ तासांच्या आत Quick Personal Loan

Navi Loan App Get Quick Personal Loan

Navi Loan App Loan in 1 Hour | १ तासांच्या आत Quick Personal Loan:

नमस्कार मित्रांनो, आर्थिक अडचण किंवा आपात्कालीन रोख संकट बरेचदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येत असतात. सध्या मार्केटमध्ये आपण अनेक Quick Loan बद्दलच्या जाहिराती बघितलेल्या असतील. नक्की हे Quick Loan म्हणजे आहे तरी काय? खरंच आपल्याला आर्थिक संकटात Quick Loan मिळू शकते का? याबद्दल आज आपण एका लोन ॲप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो हल्लीच्या काळात लोन ॲप बद्दल सर्वांनाच माहिती झालेली आहे. असंच भारतात कर्ज देणारे ॲप पैकी नावी लोन ॲप | NAVI Loan App हे एक अग्रगण्य ॲप असून याद्वारे आपण पर्सनल लोन किंवा होम लोन घेऊ शकतो. Navi Loan App बद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात.

Navi Loan App मध्ये मिळणारे सुविधा :

  • Navi Loan App द्वारे आपण Quick Personal Loan घेऊ शकता. हे Personal Loan २० लाखांपर्यंत सुरुवाती व्याजदर ९.९% वार्षिक दराने आपल्याला भेटते.
  • Navi Loan App द्वारे आपण गृह कर्ज म्हणजेच Home Loan देखील घेऊ शकतो. हे Home Loan आपल्याला सुरुवाती व्याजदर ७.३९% वार्षिक दराने आपल्याला ५ कोटी पर्यंत मिळू शकते.
  • या ॲप द्वारे आपण Health Insurance देखील घेऊ शकतो.
  • तसेच या ॲप द्वारे आपण Mutual Funds मध्येही गुंतवणूक करू शकतो.

देशात सध्याला फायनान्स इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आपल्याला आढळून येते. यामुळेच सध्याला अनेक बँक किंवा लोन ॲप आपल्याला इन्स्टंट लोन म्हणजेच त्वरित कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात. Navi Loan App द्वारे कागदपत्रांशिवाय आपण १ तासाच्या आत पर्सनल लोन घेऊ शकता. जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल आणि तुम्ही पात्र असाल, तर तुम्ही चांगले व्याजदर आणि सोयीस्कर कालावधी  साठी २० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. Navi Loan App द्वारे इन्स्टंट म्हणजेच Quick Personal Loan म्हणजे काय आणि ते कसे घेता येते ते बघुयात.

Navi Quick Personal Loan म्हणजे काय?

Quick Personal Loan म्हणजेच झटपट वयक्तिक कर्ज म्हणजेच कर्जाचा अर्ज आणि तुम्हाला कर्ज मिळेपर्यंत यांच्यातील वेळ ही अत्यंत कमी असते. हे लोन ॲप च्या माध्यमातून तुम्हाला तुमची सर्व वयक्तिक माहिती आणि KYC साठी आधार आणि PAN सारखी काही नमूद केलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतात. Quick Personal Loan अत्यंत सोप्या अर्जप्रणाली मुळे लोकांच्या पसंतीस पडलेले आहे. कमी वेळेत आणि कुठलाही त्रास ना होता सोयीस्कर पद्धतीने आपण अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुमची पात्रता तपासली जाते. जर तुम्ही पात्र असालतर कर्जाची रक्कम त्वरित मंजूर केली जाते. मंजूर केलेली रक्कम एक तासाच्या आत तुमच्या खात्यावर जमा केली जाते.

Navi Quick Personal Loan व्याजदर, मर्यादा आणि परतफेडीचा कालावधी :

  • या लोन चे व्याजदर साधारणतः ९.९% प्रतिवर्ष* इतका असू शकतो.
  • या लोन द्वारे आपल्याला २० लाखांपर्यंत कर्ज घेता येऊ शकते.
  • या लोनचा परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त हा ६ वर्षे इतका असू शकतो.

Navi Quick Personal Loan चे वैशिष्ट्ये आणि फायदे :

  • संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस असते.
  • कमीतकमी कागदपत्रांची आवश्यकता असते.
  • त्वरित कर्ज मंजुरी आणि वाटप होते.
  • आकर्षक व्याजदर आपल्याला भेटते.
  • परतफेडीचा कालावधी आपण सोयीनुसार ठरवू शकतो.
  • कर्जाची रक्कम आपण कोणत्याही कारणासाठी वापरू शकता.

Navi Quick Personal Loan पात्रता:

  • अर्जदार हा भारताचा नागरिक आणि रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वे हे १८ वर्ष पूर्ण झालेले असावे.
  • अर्जदार हा नोकरी किंवा स्वयंरोजगार करणारा असावा.
  • किमान मासिक उत्पन्न १०,०००/- रुपये असावे.
  • क्रेडिट स्कोअर ६५० आणि त्यावर असावे.

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :

नोकरीस्वयंरोजगार
ओळखीचा पुरावापॅन, आधार, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, इ.पॅन, आधार, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र इ.
पत्त्याचा पुरावाआधार, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, इ.आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, नोंदणीकृत कार्यालय/व्यवसाय पत्त्याचा पुरावा इ.
उत्पन्नाचा पुरावाशेवटच्या 3 महिन्यांची पगार स्लिपशेवटच्या 6 महिन्यांची बँक खाते विवरण (Statement)

तथापि, जर तुम्ही Navi Loan App द्वारे कर्जासाठी अर्ज करत असाल, तर तुम्हाला तुमचा केवायसी पूर्ण करण्यासाठी फक्त तुमचा पॅन आणि आधार दाखवावा लागेल. तुमचे वैयक्तिक तपशील योग्य असल्यास, पात्र रक्कम काही मिनिटांत थेट तुमच्या खात्यात वितरित केली जाऊ शकते.

Navi Loan App द्वारे कर्जासाठी अर्ज कसा करावा?

तुम्ही 1 तासात त्वरित कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला खाली नमूद केलेली कागदपत्रे सादर करावी लागतील :

  • Google Play Store आणि App Store वरून Navi ॲप डाउनलोड करा आणि तुमचा मोबाइल नंबर प्रदान करून आणि नंबरवर पाठवलेला OTP प्रविष्ट करून ॲपवर नोंदणी करा.
  • एकदा तुम्ही नोंदणीकृत वापरकर्ता झालात की, तुम्ही ‘Apply’ टॅबवर क्लिक करू शकता.
  • तुमचे पूर्ण नाव, वय, वैवाहिक स्थिती आणि पिन कोड प्रविष्ट करा.
  • तुमचा व्यवसाय आणि तुम्ही कमावलेल्या मासिक उत्पन्नाचा तपशील द्या.
  • तुमचा पॅन कार्ड क्रमांक द्या.
  • अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
  • Navi कर्जाच्या रकमेला तत्वतः मान्यता देईल.
  • कर्ज मिळविण्यासाठी, कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडा.
  • तुमचा सेल्फी क्लिक करा, तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमच्या पालकांचे पूर्ण नाव टाका.
  • तुमच्या बँकेचे नाव आणि त्याचा IFSC कोड द्या.
  • तुमच्या बँक खात्यातून स्वयंचलितपणे EMI भरण्यासाठी ऑटो डेबिट आदेश सेट करा.
  • Navi तुमच्या तपशीलांची पडताळणी करेल आणि त्यानंतर लगेच कर्ज मंजूर करेल.

कर्ज घेण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :

तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा

  • कर्ज नाकारणे टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी नेहमी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा.
  • तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी सर्वोत्तम वैयक्तिक वित्त पद्धतींचे अनुसरण करा.

आपल्याला आवश्यक असलेली रक्कम उधार घ्या

  • तुमच्या गरजेपेक्षा जास्त असलेल्या कर्जाच्या रकमेसाठी तुम्ही पात्र होऊ शकता.
  • आपल्याला आवश्यक असलेल्या रकमेवर टिकून राहण्याचा प्रयत्न करा.
  • हे तुम्हाला EMI भरताना अनावश्यक ताणापासून वाचवेल

अल्प मुदतीची किंवा दीर्घ मुदतीची कर्जे

  • कमी कालावधीचा अर्थ म्हणजेच कर्जे त्वरित बंद करणे आणि कमी व्याज भरणे होय. पण यासाठी आपल्याला EMI जास्त असेल.
  • दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी, EMI कमी असतात परंतु तुम्हाला व्याज म्हणून जास्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळे, तुमच्या आर्थिक स्थितीवर आधारित तुमच्यासाठी जे काही योग्य असेल ते निवडा.

कर्जासाठी महत्वाचे :

तात्काळ रोख कर्ज आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या आर्थिक गरजांना मदत करू शकते. तुम्ही अशी कर्जे तुमच्या लग्नासाठी, प्रवासासाठी, वैद्यकीय बिले भरण्यासाठी इत्यादीसाठी वापरू शकता. तथापि, तुम्ही सर्व योग्य तपशील देत आहात याची खात्री करा. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती कर्ज नाकारण्यास कारणीभूत ठरू शकते.

Navi App बद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत संकेस्थळ : https://navi.com/

FAQ :

  1. खराब CIBIL स्कोअरसह त्वरित रोख कर्ज कसे मिळवायचे?

    तुमचा क्रेडिट स्कोअर तुमची क्रेडिट पात्रता दर्शवतो. तुमचा क्रेडिट स्कोअर ६०० पेक्षा कमी असल्यास, एकतर तुमचा कर्ज अर्ज नाकारला जाईल किंवा तुम्हाला तुमच्या कर्जावर जास्त व्याज द्यावे लागेल.

  2. मी माझ्या कर्जाची पूर्वफेड करू शकतो का?

    होय, नियोजित कालावधीपूर्वी तुमच्या कर्जाची प्रीपेमेंट करू शकता. परंतु यासाठी आधी संबंधित माहिती अधिकाऱ्याशी सविस्तर माहिती घेऊ शकता.

  3. मी माझ्या रोख कर्जाची परतफेड कशी करू?

    तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड सुलभ EMI किंवा समान मासिक हप्त्यांमध्ये करू शकता. तुमची परतफेड तपासण्यासाठी ऑनलाइन वैयक्तिक कर्ज EMI कॅल्क्युलेटर वापरा. तसेच, कोणतीही अडचण टाळण्यासाठी, एक ऑटो-डेबिट सेट करा जेणेकरून प्रत्येक महिन्याची तुमची EMI रक्कम तुमच्या खात्यातून देय तारखेला ऑटो-डेबिट होईल. तथापि, तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक असल्याची खात्री करा जेणेकरून तुमची मासिक परतफेड चुकणार नाहीत.

  4. मी EMI पेमेंट चुकवल्यास काय होईल?

    तुम्ही तुमचा EMI अनेक वेळा भरण्यात अयशस्वी झाल्यास, पेनल्टी फी आकारली जाऊ शकते. त्या व्यतिरिक्त, ते तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये देखील अडथळा आणू शकते. यामुळे तुम्हाला भविष्यात कोणतीही क्रेडिट लाइन मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते.

  5. मला कागदपत्रांशिवाय त्वरित रोख कर्ज मिळू शकते का?

    तुम्ही कमीत कमी कागदपत्रांसह त्वरित रोख कर्ज मिळवू शकता. उदाहरणार्थ, Navi App सह, तुमचा कर्ज अर्ज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पॅन आणि आधार कार्ड आवश्यक असेल. Navi कडून त्वरित रोख कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट्स, पगाराच्या स्लिप्स इत्यादी सारखा कोणताही पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही.

अस्वीकरण : हा लेख अंतर्गत डेटा, सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती आणि विश्वासार्ह असल्याचे मानले जाणारे इतर स्त्रोत यांच्या आधारावर तयार केले गेले आहे. या लेखातील माहिती केवळ सामान्य हेतूंसाठी आहे. याला गुंतवणुकीचा सल्ला मानू नये. लेख माहितीच्या पूर्णतेची किंवा अचूकतेची हमी देत ​​नाही आणि या माहितीच्या वापरामुळे उद्भवलेल्या सर्व दायित्वे, तोटे आणि हानी अस्वीकृत करतो. या लेखाच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी वाचक पूर्णपणे जबाबदार असतील.

वरील लेख आपल्याला कसा वाटलं यासाठी आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले मत देऊ शकता. आपल्याला काही शंका असल्यास आपण प्रश्न विचारू शकता. जर आपण Navi App चे ग्राहक असाल तर आपला अभिप्राय नोंदवू शकता. धन्यवाद!

इतर कर्ज माहिती :
Money Tap अँप द्वारे लोन कसे काढावे.
शेती कर्जविषयी माहिती जाणून घ्या.
PM मुद्रा लोन विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
पर्सनल Overdraft लोन म्हणजे काय?

Personal Loan Advantages and Disadvantages Story भारतातील 10 सर्वोत्तम वैयक्तिक कर्ज देणारे ऑनलाइन अॅप्लिकेशन Festive Offers: Top 10 Banks Providing Best Car Loan. सर्व प्रकारच्या बँक कर्जासाठी सविस्तर वाचा
Personal Loan Advantages and Disadvantages Story भारतातील 10 सर्वोत्तम वैयक्तिक कर्ज देणारे ऑनलाइन अॅप्लिकेशन Festive Offers: Top 10 Banks Providing Best Car Loan. सर्व प्रकारच्या बँक कर्जासाठी सविस्तर वाचा
Notifications preferences