Buddy Loan Apps Detail Information- Benefits, Eligibility, Rate of Interest, Tenure | बडी लोन अॅप्लिकेशन बद्दल सविस्तर माहिती :
नमस्कार मित्रांनो, कर्ज घेण आजकाल बहुदा गरजेच होत आहे. पर्सनल लोन, शैक्षणिक लोन, ट्रॅवल लोन, बिझनेस लोन, कार लोन, टू व्हीलर लोन, मेडिकल लोन, होम लोन किंवा गोल्ड लोन कोणत्याही कर्जाची गरज दैनंदिन जीवनात लागतच असते.
डिजिटल युगात बँक आणि त्यांच्या वेळ घेणाऱ्या प्रोसेस बऱ्याच जणांना अवघड जाते. म्हणूनच सध्याच्या काळात डिजिटल प्रोसेसिंग करून कमी वेळेत आणि अगदी सोयीस्कर सोप्या पद्धतीने कर्ज मिळवणे शक्य होत आहे. अश्याच एका डिजिटल अॅप्लिकेशन मध्ये समावेश आहे “Buddy Loan Apps” चा.
बडी लोन App हे भारतातील एक डिजिटल प्रोसेसिंग करणारे अग्रगण्य App आहे. बडी लोन App द्वारे अनेक प्रकारचे कर्ज घेण्याची सोय आहे. हे एक ऑनलाइन अॅप्लिकेशन असल्याने तुम्ही गूगल प्ले स्टोर वरुण अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा ऑनलाइन संकेतस्थळावर लॉगिन करून देखील तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.
महत्वाचे : बडी लोन ही कुठल्याही प्रकारे बँक किंवा कर्ज देणारी NBFC संस्था नसून हे एक एग्रीगेटर प्लॅटफॉर्म आहे ज्याचे इतर NBFC संस्थांशी भागीदारी आहे.
Buddy Loan App Download Here – https://play.google.com/store/apps/details?id=com.buddyloan.vls&hl=en_IN&gl=IN
Buddy Loan Online Registration – https://www.buddyloan.com/
बडी लोन App चे वैशिष्टे आणि फायदे :
- ज्या लोकांना कर्जाची आवश्यकता आहे अश्या लोकांना एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे.
- ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे सहज आणि सोप्या पद्धतीने कर्जासाठी अर्ज करता येऊ शकतो.
- घरी बसून सहज आणि सोयीस्कर पने कर्जाचा अर्ज सादर करून सर्व प्रोसेस करता येते.
- एकाच वेळेस अनेक बँका आणि NBFC संस्था ज्यांच्याशी बडी लोन App भागीदार आहे त्यांच्या सर्व प्रकारच्या कर्जाचा फायदा आपण घेऊ शकता.
- सर्व कागदपत्र आणि कर्जासाठी अर्ज तसेच सर्व कर्ज प्रक्रिया ऑनलाइन होते.
- बडी लोन App द्वारे अनेक वेग वेगळ्या प्रकारचे कर्ज आपण घेऊ शकता जसे की पर्सनल लोन, शैक्षणिक लोन, ट्रॅवल लोन, बिझनेस लोन, कार लोन, टू व्हीलर लोन, मेडिकल लोन, होम लोन किंवा गोल्ड लोन.
- एकाच प्लॅटफॉर्म वरुण सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देणारे ही भारतातील एक अग्रगण्य App आहे.
बडी लोन App द्वारे उपलब्ध असणारे लोन :
बडी लोन app द्वारे आपण पुढील प्रकारच्या सर्व कर्जा साठी अर्ज करू शकता.
- पर्सनल लोन
- शैक्षणिक लोन
- ट्रॅवल लोन
- बिझनेस लोन
- कार लोन
- टू व्हीलर लोन
- मेडिकल लोन
- होम लोन
- गोल्ड लोन.
बडी पर्सनल लोन :
- पर्सनल लोन घेणे सध्या सर्वांना सोयीस्कर असते. अनेकदा येणाऱ्या पैश्यांच्या कुठल्याही गरजेसाठी तत्काल आणि कमीत कमी कागदपत्र देता पर्सनल लोन सहज उपलब्ध होते.
- बडी लोन App द्वारे आपण इन्स्टंट पर्सनल लोन मिळवू शकता.
- अत्यंत कमी वेळेत अगदी सोप्या पद्धतीने ही कर्ज मिळवता येते.
बडी पर्सनल लोन वैशिष्ट्ये आणि फायदे :
- कसल्याही प्रकारच्या तारण शिवाय बडी पर्सनल लोन साठी अर्ज करता येऊ शकतो.
- रु. 15,00,000 पर्यन्त कर्जासाठी अर्ज करता येऊ शकतो.
- लोन परतफेडईचा कालावधी लवचिक असून तो 6 महीने ते 60 महिन्यांपर्यंत असू शकतो.
- App द्वारे 80% पर्यन्त शक्यता असते कर्ज भेटण्याचे.
- कमीत कमी 1000 ते 15,00,000 पर्यन्त कर्जासाठी अर्ज करता येतो.
- बडी पर्सनल लोन चे व्याजदर 11.99% प्रतिवर्ष पासून पुढे आहे.
- जलद मंजूरी.
- कर्ज लवकर बंद करण्यासाठी तसेच इतर कोणत्याही गोष्टींसाठी कसलेही छुपे शुल्क नाही.
- बडी पर्सनल लोन ही सुरक्षित असून तुमच्या सर्व कागदपत्रांची सुरक्षेची हमी देते.
बडी पर्सनल लोन पात्रता निकष :
पर्सनल लोन पात्रता हे प्रतेक बँक आणि NBFC संस्था साठी वेग वेगळे असू शकतात. नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या व्यक्तींना पुढील काही पात्रता कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत.
- 1. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- 2. अर्जदाराचे वय हे 18 ते 60 वर्षांपर्यंत असावे.
- 3. नोकरी करणार अर्जदार किमान 2 वर्ष सध्या काम करत असलेल्या कंपनीचा कर्मचारी असावा.
- 4. मासिक उत्पन्न किमान 15000 नॉन मेट्रो शहरा करीत आणि 20000 मेट्रो शहारा करीत असावे.
- 5. स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या अर्जदाराचे किमान 2 – 3 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र आणि आयकर प्रमाणपत्र असावे.
- 6. अर्जदाराचे क्रेडिट स्कोर किमान 650 असावे.
बडी पर्सनल लोन कागदपत्र :
- ओळखपत्र
- राहण्याचा पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा
- पासपोर्ट फोटो
बडी बिझनेस लोन :
छोट्या किंवा मोठ्या उद्योग व्यावसायिकांना उद्योग क्षेत्रात अनेकदा पैश्यांची गरज भासत असते जसे की उद्योगाला मोठे करण्यासाठी, नवीन यंत्रे घेण्यासाठी किंवा वार्षिक आयकर भरण्यासाठी. कोणत्याही गरजेला पूर्ण करण्यासाठी उद्योजकांना व्यावसायिक कर्ज म्हणजेच बिझनेस लोन हे अत्यंत उपयुक्त आहे.
बडी बिझनेस लोन हे स्वतःचा व्यवसाय करणारे म्हणजेच डॉक्टर, वकील, CA अश्या अर्जदारांपासून ते मोठ्या कंपनी जसे की प्रायवेट लिमिटेड, पार्टनर्शिप फर्म किंवा उत्पादन करणाऱ्या कंपन्या पर्यन्त सर्व अर्ज करू शकतात.
बडी बिझनेस लोन वैशिष्ट्ये आणि फायदे :
- रु. 15,00,000 पर्यन्त विना तारण कर्जासाठी आणि 1 Cr. पर्यन्त तारण ठेऊन अर्ज करता येऊ शकतो.
- लोन परतफेडईचा कालावधी लवचिक असून तो 12 महीने ते 60 महिन्यांपर्यंत असू शकतो.
- App द्वारे 80% पर्यन्त शक्यता असते कर्ज भेटण्याचे.
- बडी बिझनेस लोन चे व्याजदर 11.99% प्रतिवर्ष पासून पुढे आहे.
- जलद मंजूरी.
- कर्ज लवकर बंद करण्यासाठी तसेच इतर कोणत्याही गोष्टींसाठी कसलेही छुपे शुल्क नाही.
- बडी बिझनेस लोन ही सुरक्षित असून तुमच्या सर्व कागदपत्रांची सुरक्षेची हमी देते.
बडी बिझनेस लोन पात्रता निकष :
बिझनेस लोन पात्रता हे प्रतेक बँक आणि NBFC संस्था साठी वेग वेगळे असू शकतात. स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या व्यक्तींना पुढील काही पात्रता कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत.
- 1. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- 2. अर्जदाराचे वय हे 23 ते 57 वर्षांपर्यंत असावे.
- 3. मासिक उत्पन्न किमान 15000 नॉन मेट्रो शहरा करीत आणि 20000 मेट्रो शहारा करीत असावे.
- 4. 3 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र आणि आयकर प्रमाणपत्र असावे.
- 5. अर्जदाराचे क्रेडिट स्कोर किमान 750 असावे.
बडी बिझनेस लोन कागदपत्र :
- ओळखपत्र
- राहण्याचा पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा
- आयकर पुरावा
- कंपनी किंवा फर्म चे रजिस्ट्रेशन कागदपत्र
- पासपोर्ट फोटो
बडी ट्रॅवल लोन :
देशांतर्गत किंवा इतर देशांमध्ये फिरण्यासाठी जाण्याची आवड सर्वांनाच असते. सर्व खर्च वगळता मासिक उत्पन्नातून फिरण्यासाठी बचत करणे हे सहज शक्य होत नाही. अश्या वेळेस ट्रॅवल लोन घेऊन नंतर सोयीस्कर परतफेड करणे ही पर्यायी चांगले ठरते. ट्रॅवल लोन मुळे अनेकांचे फिरण्याचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत.
बडी ट्रॅवल लोन वैशिष्ट्ये आणि फायदे :
- कसल्याही प्रकारच्या तारण शिवाय बडी ट्रॅवल लोन साठी अर्ज करता येऊ शकतो.
- रु. 15,00,000 पर्यन्त कर्जासाठी अर्ज करता येऊ शकतो.
- लोन परतफेडईचा कालावधी लवचिक असून तो 6 महीने ते 60 महिन्यांपर्यंत असू शकतो.
- कमीत कमी 1000 ते 15,00,000 पर्यन्त कर्जासाठी अर्ज करता येतो.
- बडी ट्रॅवल लोन चे व्याजदर 11.99% प्रतिवर्ष पासून पुढे आहे.
- जलद मंजूरी.
- कर्ज लवकर बंद करण्यासाठी तसेच इतर कोणत्याही गोष्टींसाठी कसलेही छुपे शुल्क नाही.
- बडी ट्रॅवल लोन ही सुरक्षित असून तुमच्या सर्व कागदपत्रांची सुरक्षेची हमी देते.
बडी ट्रॅवल लोन कागदपत्र :
- ओळखपत्र
- राहण्याचा पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा
- पासपोर्ट फोटो
बडी ट्रॅवल लोन पात्रता निकष :
ट्रॅवल लोन पात्रता हे प्रतेक बँक आणि NBFC संस्था साठी वेग वेगळे असू शकतात. नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या व्यक्तींना पुढील काही पात्रता कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत.
- 1. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- 2. मासिक उत्पन्न किमान 15000 नॉन मेट्रो शहरा करीत आणि 20000 मेट्रो शहारा करीत असावे.
- 5. अर्जदाराचे क्रेडिट स्कोर किमान 650 असावे.
बडी विवाह कर्ज :
भारतीय प्रथेनुसार लग्न समारंभाला एक वेगळच स्थान देण्यात येते. प्रतेक व्यक्तीच्या आयुष्यातील लग्न सोहळा हा कायम अविस्मरणीय असावा सर्वांनाच वाटते. सध्या भारतात थाटात लग्न पार पाडण्यासाठी विविध प्रकारचे लग्नाचे नियोजन केले जाते. विविध प्रसिद्ध ठिकाणी किंवा अनोख्या ठिकाणी लग्न करण्याचे नवीन प्रकार आपण बघतोच. अश्या सोहळ्या साठी खर्चाचे प्रमाण अधिक असते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठीच विवाह कर्ज घेणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. विवाह कर्जाचे पात्रता निकष आणि कागदपत्र हे वरती दिलेल्या पर्सनल लोन सारखेच बघायला मिळते.
बडी कार लोन आणि टू व्हीलर लोन :
कार घेण किंवा टू व्हीलर घेण ही अनेकांचे स्वप्न असते. सध्याच्या काळात स्वतःची हक्काची कार किंवा टू व्हीलर ही एक अत्यंत महत्वाची गरज देखील आहे. यासाठीच बडी लोन हे कार किंवा टू व्हीलर साठी देखील कर्ज देऊ करते. आपण ऑनलाइन यासाठी अर्ज करून सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करू शकता. कर्जाचे पात्रता आणि निकष हे घेत असलेल्या कार किंवा टू व्हीलर निहाय बदलू शकते. यासाठी अधिक माहिती हवी असल्यास आपण बडी लोन app वरुण खात्री करू शकता.
बडी मेडिकल लोन :
मेडिकल आपत्कालीन परिसतिथी ही कोणावर कधीही येऊ शकते. अशा वेळेस पैश्यांच्या एमर्जन्सि मध्ये मेडिकल लोन घेणे हे खूप गरजेचे असते. अश्या आपत्कालीन परिसतिथी मध्ये कर्जासाठी धावपळ करण्यापेक्षा बडी मेडिकल लोन चा तत्काल उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. बडी मेडिकल लोन पात्रता निकष आणि कागदपत्र हे वरती दिलेल्या पर्सनल लोन सारखेच बघायला मिळते.
बडी शैक्षणिक लोन :
बडी शैक्षणिक लोन हे कुठल्याही विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहे. कोणताही विद्यार्थी ऊच्य शिक्षणासाठी शैक्षणिक लोन घेऊ शकतो. देशातील किंवा देश बाहेरील सर्व नामांकित आणि सरकारी नियुक्त केलेल्या कॉलेज किंवा विद्यापीठातून शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या सर्व फीस या कर्जा द्वारे आपण भरून शिक्षण पूर्ण करू शकता. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर किमान 1 वर्ष नंतर या कर्जाची परतफेड सुरू होते. या कर्जासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता अधिक महत्वाची असते. बँक व्यवहार चांगला असेल आणि सीबील स्कोर उत्तम असेल तर बडी लोन app द्वारे कर्ज घेणे अगदी सहज सोप्पे होते. यासाठी काही पात्रता निकष पुढील प्रमाणे असू शकतात.
बडी शैक्षणिक लोन पात्रता निकष :
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय 18 पूर्ण असावे असे नसल्यास त्यांच्या पालकांना कर्जासाठी अर्ज करावा लागतो.
- अर्जदाराची शैक्षणीक गुणवत्ता चांगली असावी.
- अर्जदाराने निवडलेले शैक्षणिक संस्था सरकारने नेमून दिलेली असावी.
- महत्वाचे म्हणजे जर शैक्षणिक कोर्स हा नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त असावा. अश्या करजांना बँक प्राधान्य देते.
बडी शैक्षणिक लोन कागदपत्र :
- ओळखपत्र
- राहण्याचा पुरावा
- पालकांचा उत्पन्नाचा पुरावा ज्यांच्यावर विद्यार्थी अवलंबून आहे
- शैक्षणिक कागदपत्रे
- पासपोर्ट फोटो
बडी होम लोन :
स्वतःचे घर घेणे अनेकांचे स्वप्न असते. नवीन घर घेण्यास किंवा घराचे बांधकाम करण्यास होम लोन ची आवश्यकता आपल्याला भासू शकते. अत्यंत माफक व्याजदरात आणि किमान वेळेत बडी होम लोन साठी आपण अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या होम लोन साठी आपण अर्ज करू शकतो जसे की जमीन खरेदी, घराची सुधारणा, स्टंप ड्यूटि भरण्यासाठी कर्ज, किंवा बॅलेन्स ट्रान्सफर असो यासाठी आपण बडी होम लोन साठी आपण अर्ज करू शकता.
बडी होम लोन पात्रता निकष :
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय 21 ते 70 असावे. (वयाची अट गृह कर्जाच्या आणि उत्पन्नाच्या प्रकारानुसार बदलू शकते.)
- अर्जदाराचा किमान क्रेडिट स्कोर 750 किंवा त्याहून अधिक असावा.
- नोकरी करणारा अर्जदार साधारणतः 3 वर्षाहून अधिक नोकरी करणारा असावा.
- स्वयंरोजगार करणारा अर्जदाराचा व्यवसाय किमान 3 ते 5 वर्षहून अधिक असावा.
- अर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न 25000 रुपये असावे.
बडी होम लोन साठी कागदपत्र :
- बँकेचा अर्ज तुमच्या संपूर्ण महितीसाहित
- पासपोर्ट फोटो
- KYC डॉक्युमेंट (ओळखीचा आणि रहिवासी पुरावा)
- ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट
- कर्ज प्रक्रिया शुल्क चेक
- घराचे / जागेचे कागदपत्र
- नोकरी करणाऱ्याना ६ सॅलरी स्लिप
- व्यवसाय करणाऱ्याना इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटमेंट ३ वर्षांपर्यंतचे
- घर बांधकाम करणार असेलतर घराचा आराखडा
बडी गोल्ड लोन :
सोने तारण कर्ज म्हणजे गोल्ड लोन हे एक सेक्युरड लोन म्हणजेच सुरक्षित कर्ज म्हणून मानले जाते. गोल्ड लोन मध्ये तुमचे सोने ही स्थावर मालमत्ता म्हणून बँकेकडे गहाण ठेवण्यात येते. त्याबदल्यात सोन्याच्या रकमेच्या किमान 75% पर्यन्त तुम्ही बँकेकडून आर्थिक कर्ज घेऊ शकता. ठराविक कालावधीसाठी या कर्जाचे मासिक हफ्ते फेडून तुम्हाला तुमचे सोने पुनः बँकेकडून सोडवून घ्यावे लागते. सोने कर्ज म्हणजेच गोल्ड लोन वापरण्यासाठी तुम्हाला कसलीही बंदी नाही. हे कर्ज तुम्ही लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा कसल्याही आर्थिक अडचणीसाठी वापरू शकता.
बडी गोल्ड लोन पात्रता निकष :
गोल्ड लोन पात्रता हे प्रतेक बँक आणि NBFC संस्था साठी वेग वेगळे असू शकतात. स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या व्यक्तींना पुढील काही पात्रता कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत.
- 1. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- 2. अर्जदाराचे वय हे 23 ते 57 वर्षांपर्यंत असावे.
- 3. मासिक उत्पन्न किमान 15000 नॉन मेट्रो शहरा करीत आणि 20000 मेट्रो शहारा करीत असावे.
- 4. 3 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र आणि आयकर प्रमाणपत्र असावे.
- 5. अर्जदाराचे क्रेडिट स्कोर किमान 750 असावे.
बडी गोल्ड लोन कागदपत्र :
- ओळखपत्र
- राहण्याचा पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा
- पासपोर्ट फोटो
विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न (FAQ’s) :
-
बडी लोन हे सेफ आहेका?
बडी लोन हे सर्वात विश्वासार्ह अॅप्सपैकी एक आहे जिथे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे. बडी लोनने देशातील सर्वात सुरक्षित कर्जदारांसोबत भागीदारी केलेली आहे. त्यामुळे, अॅप वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित आहे.
-
बडी लोन हे RBI म्हणजेच भारतीय रिजर्व बँकेने प्रमाणित केलेले आहेका?
बडी लोन हे कुठल्याही प्रकारे बँक किंवा कर्ज देणारी NBFC संस्था नसून हे एक एग्रीगेटर प्लॅटफॉर्म आहे ज्याचे इतर NBFC संस्थांशी भागीदारी आहे जे RBI म्हणजेच भारतीय रिजर्व बँकेने प्रमाणित केलेले आहे.
-
बडी लोन App चे मालक कोण आहेत?
सतीश सराफ आणि श्रीकांत बुरेड्डी हे या App चे सह-संस्थापक आहेत.
-
बडी लोन App द्वारे कोणत्या प्रकारचे कर्ज घेता येऊ शकते?
बडी App द्वारे पर्सनल लोन, होम लोन, शैक्षणिक लोन, बिझनेस लोन, कार लोन, टू व्हीलर लोन, गोल्ड लोन, ट्रॅवल लोन तसेच मेडिकल लोन किंवा विवाह लोन देखील घेऊ शकता.
-
बडी लोन कस्टमर केयर नं. काय आहे?
0800 802 1061 or 0161 850 4141
कस्टमर केअर customerservices@buddyloans.com -
बडी लोन इंट्रेस्ट रेट काय आहे?
बडी लोन व्याजदर हे 11.99% पासून पुढे आहे.
वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारच कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.
वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
धन्यवाद!
आमच्या इतर महत्वाच्या पोस्ट :
- PM मुद्रा लोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
- Navi App Loan कसे काढावे?
- Money Tap App द्वारे कर्ज कसे काढावे?
- शैक्षणिक कर्ज कसे काढावे?
- पर्सनल ओवरड्राफ्ट लोन म्हणजे काय?
- Home Loan बद्दल सविस्तर माहिती
- विद्यालक्ष्मी शिक्षण कर्ज योजना
- कार लोन साठी टॉप १० बँका, वैशिष्ट्ये, पात्रता, प्रक्रिया शुल्क आणि निकष
- 2022 मध्ये भारतातील 10 सर्वोत्तम वैयक्तिक कर्ज देणारे ऑनलाइन अॅप्लिकेशन