शेती कर्ज | कृषी कर्ज | How to Quick apply for Agriculture Loan:
शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे बरेच शेतकरी उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या साहित्य किंवा मशिनरी यांसाठी बँकिंग मधून शेती कर्ज / कृषी कर्ज / Agriculture Loan घेत असतात. महाराष्ट्रात अनेक बँका किंवा वित्तीय संस्था अशा आहेत ज्या शेतकऱ्यांना त्यांची शेती चांगल्या पद्धतीने किंवा वाढवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी शेती कर्ज उपलब्ध करून देतात. महाराष्ट्रात अनेक कर्ज योजना महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येतात. या योजना सर्व बँकांमध्ये उपलब्ध करून दिलेले असतात. सर्व शेतकरी या बँकांमधून या कर्जांसाठी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्रातील बँका द्वारे दिले जाणारे कृषी कर्जाचे सामान्य प्रकार
- पीक कर्ज/किसान क्रेडिट कार्ड,
- कृषी मुदत कर्ज,
- कृषी कार्यरत भांडवल कर्ज,
- शेती यांत्रिकीकरण कर्ज,
- कृषी सुवर्ण कर्ज,
- फलोत्पादन कर्ज,
- वनीकरण कर्ज,
- विविध उपक्रमांसाठी कर्ज.
शेती कर्ज | कृषी कर्ज | Agriculture Loan देणाऱ्या बँका
महाराष्ट्रात शेती कर्ज / कृषी कर्ज किंवा एग्रीकल्चर लोन देणाऱ्या आघाडीच्या बँका जसे की,
- SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया,
- बँक ऑफ महाराष्ट्र,
- युनियन बँक ऑफ इंडिया,
- HDFC बँक,
- अलाहाबाद बँक,
- बँक ऑफ बडोदा
- आयसीआयसीआय बँक,
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
- बँक ऑफ इंडिया,
- करूर वैश्य बँक,
- आंध्रा बँक कॅनरा बँक,
- इको बँक इ. आहेत.
१. SBI कृषी कर्ज : SBI बँक देशातली सर्वात जास्त शेतकरी कर्ज देणारी बँक असून SBI बँक मध्ये अनेक प्रकारचे शेतकरी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जसे की,
- किसान क्रेडिट कार्ड: किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना ४% दराने त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जर तुम्ही SBI बँक मधून कृषी कर्ज घेतले असेल तर किसान क्रेडिट कार्ड विनामूल्य तुम्हाला दिले जाते. या कार्ड ची किमान मर्यादा ३ लाख इतकी आहे.
- सोने कर्ज: SBI बँक मध्ये सोने तरण ठेवून कर्ज घेण्याची देखील तरतूद आहे. हे कर्ज आकर्षक व्याजदरात तुम्ही उपलब्ध करू शकता. सोने कर्जाची प्रक्रिया अतिशय सोपी मानली जाते.
अधिक माहितीसाठी आपण बँकेच्या पुढील लिंक वर क्लिक करून जाणून घेऊ शकता https://sbi.co.in/hi/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan
२. बँक ऑफ महाराष्ट्र:
बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत अनेक प्रकारचे कृषी कर्ज सेवा उपलब्ध आहे. यापैकी काही सेवा खालील प्रमाणे:
- १. महा बँक किसान क्रेडिट कार्ड योजना.
- २. महा बँक किसान सर्व लक्ष्मी मुदत कर्ज.
- ३. महा बँक गोल्ड लोन स्कीम.
- ४. शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी ची योजना
- ५. वाहनांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची योजना (दोन आणि तीन विलर्स).
- ६. वाहनांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची योजना (चार विलर्स).
- ७. शेतकऱ्यांना वेअर हाऊस च्या पावतीवर वित्तपुरवठा करण्याची योजना.
- ८. लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी जमीन खरेदी करण्याकरता योजना.
- ९. कृषी पदवीधरांसाठी शेती क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्रांची स्थापना करण्यासाठी आर्थिक मदत.
- १०. फलोत्पादन वृक्षारोपण कार्य करण्यासाठी कर्ज योजना.
- ११. पशुसंवर्धन योजना.
- १२. शेती यांत्रिकीकरण योजना.
- १३. लघु सिंचन योजना.
- १४. हायटेक प्रोजेक्ट योजना.
- १५. शेतकरी बचत गटांना वित्त पुरवठा.
- १६. पशुसंवर्धन शेतकरी व मत्स्यपालनास महाबँक किसान क्रेडिट कार्ड योजना.
- १७. महा बँक किसान तात्काळ योजना.
- १८. मालमत्ता खरेदीसाठी कर्ज.
- १९. सौर उर्जेवर आधारित पंप सेट साठी कर्ज.
- २०. सौर वॉटर हिटर्स ना वित्तपुरवठा करणे.
- २१. सौरगृह प्रकाशयोजना वित्तपुरवठा.
- २२. महा कृषी समृद्धी योजना.
या सर्व कर्ज योजना बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जातात. अधिक माहितीसाठी आपण नजीकच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत भेट देऊन याची माहिती घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी आपण बँकेच्या पुढील लिंक वर क्लिक करून जाणून घेऊ शकता https://bankofmaharashtra.in/mar/agricultures
३. युनियन बँक ऑफ इंडिया:
युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील शॉर्ट क्रेडिट आणि लॉन्ग टर्म क्रेडिट अशा दोन प्रकारे बँकेने कर्जाची विभागणी केलेली आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये येणाऱ्या कर्ज योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
शॉर्ट टर्म क्रेडिट:
- १. गोल्ड लोन स्कीम
- २. युनियन कृषी कामधेनु गोल्ड लोन स्कीम
- ३. वेअर हाऊस / कोल्ड स्टोरेज च्या पावतीवर कर्ज योजना
- ४. युनियन ग्रीन किसान क्रेडिट कार्ड
- ५. पशुसंवर्धन आणि मत्स्य पालन किसान क्रेडिट कार्ड
- ६. चांदी तारण कर्ज
लॉन्ग टर्म क्रेडिट:
- १. युनियन कंप्रेस्ट बायोगॅस स्कीम
- २. पीएम कुसुम स्कीम (प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाभियान)
- ३. जल शुद्धीकरण योजना
- ४. हायटेक ऍग्री प्रोजेक्ट कर्ज योजना
- ५. नर्सरी कर्ज योजना
- ६. बी बियाणे उत्पादन कर्ज योजना
- ७. वृक्षारोपण आणि फलोत्पादन कर्ज योजना
- ८. दुग्ध व्यवसाय कर्ज योजना
- ९. बकरी, मेंढी आणि डुक्कर पालन कर्ज योजना
- १०. पोल्ट्री आणि अंडी उत्पादन पोल्ट्री कर्ज योजना
- ११. मत्स्य पालन कर्ज योजना
- १२. मध उत्पादन कर्ज योजना
- १३. गांडूळ खत उत्पादन कर्ज योजना
- १४. अन्न आणि कृषी प्रक्रिया उत्पादन कर्ज योजना
- १५. शेतकरी उत्पादक संघ कर्ज योजना
- १६. सिंचन कर्ज योजना
- १७. जमीन खरेदी कर्ज योजना
- १८. शेती यांत्रिकीकरण कर्ज योजना
- १९. वाहन कर्ज योजना (दोन, तीन व चार चाकी)
- २०. रेशीम उत्पादन आणि प्रक्रिया कर्ज योजना
- २१. शेती क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्रांची स्थापना करण्यासाठी आर्थिक मदत.
- २२. प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग इंटरप्राईज योजना
- २३. किसान ऑल पर्पज टर्म लोन
- २४. किसान तत्काळ कर्ज योजना
- २५. रिन्यूएबल एनर्जी इक्विपमेंट / अक्षय ऊर्जा कर्ज योजना
अधिक माहितीसाठी आपण बँकेच्या पुढील लिंक वर क्लिक करून जाणून घेऊ शकता https://www.unionbankofindia.co.in/english/agriculture-loan.aspx
महाराष्ट्रातील अशा इतरही अनेक बँका आहेत ज्या वरील प्रकारच्या सर्व कर्ज सुविधा ग्राहकांना देतात. आपण आपल्या नजीकच्या बँकेत जाऊन या सर्व योजना बद्दल माहिती घेऊ शकता.
कृषी कर्जासाठी अर्ज कसा करावा?
कृषी कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही कर्ज योजना पुन्हा एकदा तपासली पाहिजे. तुम्ही पॉलिसीच्या सर्व अटी आणि नियम वाचल्याची खात्री करा आणि बँकेने विचारलेली आवश्यक कागदपत्रे सबमिट करा. काही संस्था आणि बँका आहेत ज्या ऑनलाइन सेवा देखील देतात. या प्रकरणात, तुम्हाला फक्त बँकेच्या वेबसाइटवर योग्यरित्या नेव्हिगेट करणे आवश्यक आहे. वेबसाइटने विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. कर्ज देणारा तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल. पुनरावलोकन आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, बँक तुमचे कर्ज मंजूर करेल.
कृषी कर्जाची उद्दिष्टे
- १. तुम्ही शेतीची साधने आणि अवजारांसाठी कृषी कर्ज घेऊ शकता.
- २. शेत जमीन खरेदीसाठी व्यक्ती कर्ज घेऊ शकतात.
- ३. कृषी कर्ज मिळवण्यासाठी फलोत्पादन प्रकल्प हा देखील एक उद्देश असू शकतो.
- ४. तुमची शेतीविषयक कामे कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी तुम्ही वाहन खरेदीसाठी कर्जासाठी अर्ज करू शकता.
- ५. डेअरी युनिट स्थापन करण्यासाठी हे कर्ज मिळू शकते.
- ६. पोल्ट्री युनिटची स्थापना करणाऱ्या व्यक्तीही या कर्जाचा लाभ घेऊ शकतात.
- ७. तुम्ही हे कर्ज हंगामी गरजांसाठी देखील घेऊ शकता.
- ८. मच्छीमार हे कर्ज मासेमारीसाठी लागणारी आवश्यक सामग्रिसाठी घेऊ शकतात.
कृषी कर्जाचे फायदे
कृषी कर्जाचा मुख्य फायदा हा आहे की तुम्हाला जास्त कागदपत्रे जमा करावी लागत नाही. वैध ओळख पुरावा, पत्ता इत्यादी मुठभर कागदपत्रांसह कर्ज मिळवता येते. तुम्हाला भरलेल्या अर्जासोबत ही कागदपत्रे सादर करावी लागतील. तुमचा अर्ज मंजूर होताच, रक्कम तुमच्याकडे हस्तांतरित केली जाईल. व्याजदराच्या बाबतीत बँकांमध्ये नेहमीच स्पर्धा असते, त्यामुळे तुम्हाला कमी व्याजदरासह कर्ज सहज मिळेल. कमी दरामुळे कर्जाची परतफेड कोणत्याही ओझेशिवाय होते. बँकेने प्रदान केलेल्या विविध मुदतीच्या अटी आहेत. ते तुमच्या सोयीनुसार आणि परतफेडीच्या क्षमतेनुसार लवचिक अटी देतात.
कृषी कर्जासाठी पात्रता
शेती कर्जासाठी पात्रता निकष बँक ते बँक बदलतात आणि तुम्ही निवडलेल्या कर्जाच्या प्रकारानुसार देखील. साधारणपणे, पात्रता खालीलप्रमाणे आहेत:
- १. कृषी कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय २४ – ६५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- २. एकदा कर्ज मंजूर झाल्यानंतर व्यक्तींना बँकेला सुरक्षा म्हणून मालमत्ता प्रदान करणे आवश्यक आहे.
- ३. कर्जाच्या अटी व शर्तींवर अवलंबून, तुम्ही एकटे किंवा संयुक्त धारक म्हणून कर्जासाठी अर्ज करू शकता.
- ४. कृषी कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज अर्ज फॉर्म, केवायसी कागदपत्रे, मालमत्ता दस्तऐवज, जे कर्जासाठी सुरक्षा म्हणून काम करतील, सिक्युरिटी पीडीसी (पोस्ट-डेटेड चेक) जर कर्जदाराकडून काही इतर कागदपत्रे मागितली गेली, तर तुम्ही ते कर्ज अर्जाच्या वेळी सादर केले पाहिजेत.
कृषी कर्ज बद्दलची वरती दिलेली सर्व माहिती या दिलेल्या बँकेच्या संकेतस्थळावरती जाऊन आपण अधिकृत चौकशी करू शकता. हा लेख फक्त आपल्या माहितीसाठी असून कुठल्याही योजनेअंतर्गत जर आपल्याला कर्ज हवे असेल तर आपण संपूर्ण माहिती घेऊन या नंतरच कर्जासाठी अर्ज करावा.
वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल आपण आम्हाला कमेंट करू शकता. जर आपल्याला शेती कर्ज विषयी कुठला प्रश्न विचारायचं असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
-
शेतक-यांना कोणकोणते कर्ज दिले जाते ?
पीक कर्ज/किसान क्रेडिट कार्ड,
कृषी मुदत कर्ज,
कृषी कार्यरत भांडवल कर्ज,
शेती यांत्रिकीकरण कर्ज,
कृषी सुवर्ण कर्ज,
फलोत्पादन कर्ज,
वनीकरण कर्ज,
विविध उपक्रमांसाठी कर्ज. -
शेती क्षेत्रासाठी अल्पकालीन कर्जाचा कालावधी किती असतो ?
अल्पकालीन कर्ज ३-५ वर्षांच्या आतील कर्ज असते.
-
शेती कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय मर्यादा ?
शेती कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय २४ – ६५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
धन्यवाद!
मुद्रा योजने बद्दल सविस्तर वाचा.