कर्ज घेताय? कर्ज घेण्याआधी एकदा वाचा | Important Things to Know Before Applying for Loan 2023

पोस्ट शेअर करा :

कर्ज घेताय? कर्ज घेण्याआधी एकदा वाचा | Important Things to Know Before Applying for Loan 2023:

कर्ज घेणे ही आजकाल एक सर्वसामान्य माणसांसाठी महत्वाची गोष्ट झालेली आहे. दिवसेंदिवस कर्ज घेण्याचे प्रमाण वाढतच आहेत. टू व्हीलर, फोर व्हीलर घेण्यासाठी असो किंवा घर खरेदी अथवा आर्थिक गरजेसाठी पर्सनल लोन घेणे असो प्रतेक सामान्य माणसाच्या आयुष्यात या गोष्टी महत्वाच्या असतात. कर्ज घेणे हे आयुष्यात बऱ्याच महत्वाच्या गोष्टींमध्ये महत्वाची भूमिका बजावते. अश्या कर्जा साठी अर्ज करताना काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते ज्यामुळे तुमचे कर्ज मंजूर होणे सोयीचे ठरते.

कर्ज मंजूरीमध्ये महत्वाची बाब म्हणजेच “कर्ज घेण्यासाठीची पात्रता, नोकरीची स्थिरता, व्यवसायाची स्थिरता, सीबील स्कोअर, बँकिंग इतिहास आणि तुमचे वय यासारखे काही घटक असतात.” अर्ज करताना ही काही महत्वाचे घटक आहेत जे कर्ज मंजूर करण्यात किंवा नाकारण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

कर्जाचा अर्ज करताना महत्वाच्या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती बघूयात :

  • पात्रता : तुम्ही कर्जास पात्र आहात की नाही, हा सर्वात महत्वाचा घटक आहे जो बँक कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तपासाला जाऊ शकतो. अर्जदारची पात्रता जाणून घेण्यासाठी प्रतेक बँकांनी वेगवेगळे निकष बनवलेले असतात. जसे की तुमची नोकरी स्थिरता, नोकरी ज्या कंपनी मध्ये करता त्या कंपनीची श्रेणी, तुमची मासिक कमाई, सीबील स्कोर, तुमचं रहिवास भाडे तत्वावर आहे की स्वतःच्या मालकीचा आहे. तुमचा रहिवासी पुरावा, ओळखीचा पुरावा ई. अनेक बाबिनमुळे तुमची पात्रता बघितली जाते. यामुळे यासर्व गोष्टींचा व्यवस्थित सर्व पुरावा कर्जाचा अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे असणे गरजेचे असते.
  • नोकरीची स्थिरता : कर्ज मंजूर करताना अर्जदारची नोकरीची स्थिरता बघणे ही एक महत्वाची बाब मनाली जाते. अधिकतर बँक ६ महिन्यांपेक्षा जर तुम्ही एकाच ठिकाणी नोकरी करत असालतरच तुमहाल ग्राह्य धरतात. आधी तुम्ही कोणत्या कंपनी मध्ये नोकरी केली असेल तर तिथे किती वर्ष काम केले आहे ही देखील बघितले जाते. यामुळे तुमच्या नोकरीची स्थिरता लक्षात येते. तसेच तुमचं नोकरी करण्याच पद काय आहे आणि तुम्ही नोकरी करत असलेली कंपनी कोणत्या श्रेणी मध्ये येते ते देखील बघितले जाते. कंपन्यांची श्रेणी ही बँकेने सूचीबद्ध आणि असूचीबद्ध वर्गीकृत केलेली असते. जर तुमची नोकरी सूचीबद्ध कंपनी मध्ये असेलतरच बँक तुम्हाला कर्ज देण्यास पात्र ठरवतात.
  • सीबील स्कोअर : बँक अर्जदारचा सीबील स्कोअर देखील तपासतात. सीबील स्कोर हा तुमच्या आर्थिक व्यव्हारांवर अवलंबून असतो. तुमचे बँक खाते किती जूने आहे आणि त्या मध्ये बँकेशी किती चांगले व्यवहार तुम्ही केलेले आहेत यावर तुमचं सीबील स्कोअर बनत जाते. साधारणपणे ७५० पेक्षा अधिक सीबील स्कोअर हा कर्ज देण्यासाठी बँका चांगला म्हणून गृहीत धरतात. आजकाल ऑनलाइन विविध साइट्स कोणत्याही शुल्काशिवाय तुमचा सीबील स्कोअर तुम्हाला दाखवून देतात त्यामुळे करजसाठी अर्ज करण्यापूर्वी एकदा तुमचा सीबील स्कोअर नक्की तपासून बघा. तुमचा सीबील बघण्यासाठी पुढे काही साइट्स दिलेल्या आहेत. www.bankbazaar.com किंवा www.paisabazaar.com
  • अर्जदाराचे वय : कर्जा साठी अर्ज कण्यासाठी किमान १८ वर्षे वयाची अट महत्वाची मनाली जाते. जसे की तुम्ही जर गृहकर्ज घेत असाल तर तुमचं परतफेड करण्याचा कालावधी अधिक असतो. त्यामुळे तुमचे कर्ज परतफेड होईपर्यंत तुम्ही निवृत्त होता का याची खात्री बँक करून घेते. कमी परतफेडीच्या कर्जासाठी तुमचे किमान वय १८ पेक्षा अधिक असणे एवढेच महत्वाचे असते.   
  • अर्जदाराचे उत्पन्न : बँक कर्ज देताना बघितला जाणारा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्जदाराचे उत्पन्न. तुम्हाला कर्जाची किती रक्कम मंजूर करायची याचा निकष बँक तुमच्या उत्पन्ना बघूनच ठरवते. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ४०% रक्कम तुम्ही कर्ज हफता म्हणजेच EMI म्हणून वापरू शकता एवढेच कर्ज बँक गृहीत धरते. जर तुमचे दुसरे कोणतेही कर्ज चालू असेलतर त्याचा मासिक हाफता देखील बँक गृहीत धरते.
  • व्यवसाय स्थिरता : कर्ज करणार अर्जदार जर स्वयंरोजगार करणारा असेल तर त्याच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती बँकेला नमूद करावी लागते. तुमचा व्यवसाय किती वर्ष जून आहे, तुमचे वार्षिक आणि मासिक उत्पन्न किती आहे यासोबतच तुमचे इन्कम टॅक्स भरण केलेली पावती देखील बँकेत कर्ज घेताना जमा करावी लागते. सर्वसाधारण ३ वर्ष पेक्षा अधिक छळणाऱ्य व्यवसाय बँक चांगला मानतात.

वरती दिलेली माहिती ऑनलाइन मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही आपल्याला दिलेली आहे. कसल्याही प्रकारचा कर्ज आपल्याला हवं असल्यास आपण बँक शाखेत जाऊन रीतसर चौकशी करून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.

वरती दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली किंवा दिलेल्या माहितीबद्दल अजून काही आपल्याला विचारायचे असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

धन्यवाद!

आमच्या इतर महत्वाच्या पोस्ट :


पोस्ट शेअर करा :

Leave a Comment

Personal Loan Advantages and Disadvantages Story भारतातील 10 सर्वोत्तम वैयक्तिक कर्ज देणारे ऑनलाइन अॅप्लिकेशन Festive Offers: Top 10 Banks Providing Best Car Loan. सर्व प्रकारच्या बँक कर्जासाठी सविस्तर वाचा
Personal Loan Advantages and Disadvantages Story भारतातील 10 सर्वोत्तम वैयक्तिक कर्ज देणारे ऑनलाइन अॅप्लिकेशन Festive Offers: Top 10 Banks Providing Best Car Loan. सर्व प्रकारच्या बँक कर्जासाठी सविस्तर वाचा